*महा लिग टेबल टेनिस क्रीडा स्पर्धा होणार*
औरंगाबाद (. ) महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन वतीने दि. १८ जून रोजी डेक्कन जिमखाना पुणे येथे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
सभेचे अध्यक्ष स्थान राज्य अध्यक्ष प्रवीण लुकड यांनी भुषविले. याप्रसंगी उपस्थित राज्य महासचिव यतिन टिपणीस, राज्य उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, शिवाजी सरोदे, आशिष बोडस, कोषाध्यक्ष संजय कडू, सचिव ॲड. अशितोष पोतनीस, उपस्थित होते.
वार्षिक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली पहिली राज्य नामांकन टेबल टेनिस स्पर्धा सांगली, , दुसरी नागपूर, तिसरी नांदेड, चौथी चंद्रपूर, पाचवी ठाणे येथे होणार तर. राज्य अजिंक्यपद टे.टे. स्पर्धा पुणे येथे होणार आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील खेळाडू अधिक स्पर्धा खेळता यावे यासाठी महा लिग टेबल टेनिस स्पर्धा आयोजन करण्यात बाबत ठराव घेऊन कार्यक्रम ची आखणी करण्यात आली. स्पर्धा औरंगाबाद, नागपूर, पुणे या ठिकाणी होतील . विभागीय ६ संघ राहतील, महाराष्ट्र राज्य तील ४ खेळाडू व इतर राज्यतील २ खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे अशी माहिती महा लिग टे.टे. स्पर्धा संयोजक प्रकाश तुळपुळे यांनी दिली.
महा लिग टे.टे. स्पर्धा महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन अंतर्गत होतील व यास प्रायोजक कंपनी मार्फत घेऊ असे मत राज्य अध्यक्ष प्रविण लुकड यांनी व्यक्त केले.
बैठकीस माजी अध्यक्ष राजीव बोडस , प्रकाश तुळपुळे, नरेंद्र छाजडे, विभागीय सचिव राऊत, कोकण विभाग संजय कडू, मराठवाडा विभाग गणेश माळवे, उत्तर महाराष्ट्र
राज्य कार्यकारिणी सदस्य कुलजितसिंग दरोडा, सुभाष देसाई, अजित गाळवणकर, शेखर भंडारी, महेंद्र चिपळूणकर, विविध जिल्ह्यातील सचिव उपस्थित होते .
addComments
टिप्पणी पोस्ट करा