25 रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूकांचा दर्शन सोहळा

नांदेड - श्री दत्तात्रयाचे प्रथम अवतार आंध्र प्रदेश राज्यातील पिठापूर महासंस्थानच्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूकांचे आगमन नांदेड शहरात दि.24 रोजी होणार असून या पादूकांचे भाविक भक्तांना दि.25 जून रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत दर्शन घेता येणार आहे.

आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानला अनन्यसाधारण महत्व आहे. जगभरातून या ठिकाणी श्री दत्तात्रयांचा प्रथम अवतार असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ समाधीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. नांदेड जिल्ह्यात सुध्दा या महासंस्थानचा मोठा भाविक वर्ग आहे.
अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादूका नांदेड शहरात दि.24 रोजी रात्री 8 वाजता येणार आहेत. कलामंदिरच्या पाठीमागे असलेल्या सोमेश कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये या पादूकांचा मुक्काम राहणार आहे. दि.25 रोजी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व भाविक भक्तांना या पादूका दर्शनचा लाभ घेता येणार आहे.
तरी शहर व जिल्ह्यातील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, सौ.मृणाल राजूरकर, सौ.रंजना सावंत, सौ.कविता हंबर्डे, विजय पाटील चव्हाण, सौ.कविता चव्हाण, निरंजन खतगावकर, डॉ.सौ.मिनल खतगावकर, विजय येवनकर, सौ.मोहिनी येवनकर, दिनेश बाहेती, सौ.सविता बाहेती, गोविंदराव नागेलीकर, सौ.विमल नागेलीकर, संजय लहानकर, सौ.वंदना लहानकर, किशोर स्वामी, सौ.शैलजा स्वामी, निलेश पावडे, सौ.जयश्री पावडे, संतोष पांडागळे, सौ.सुषमा पांडागळे, ऋषीकेश नेरलकर, सौ.अपर्णा नेरलकर, महेश कनकदंडे, सौ.मोहिनी कनकदंडे, नंदकुमार कोसबतवार, सौ.मंजू कोसबतवार, डॉ.अंकुश देवसरकर, डॉ.सौ.शुभांगी देवसरकर, सुरेश कुलकर्णी, सौ.उर्मिला कुलकर्णी, श्रीकांत गुंजकर, सौ.संगीता गुंजकर, दर्शन राजूरकर, सौ.गायत्री राजूरकर, सुनिल शर्मा, ॲड.व्ही.एम.पवार, हेमंत गिते, संदीप कोटगिरे, श्रीनिवास चौधरी, गजनन पिंपरखेडे, लक्ष्मीनारायण शर्मा, विजय गवारे, अमित तेहरा, संतोष कुलकर्णी, लक्ष्मीकांत गोणे, राजेश पावडे, राजू यन्नम, आनंद चव्हाण, सतीष देशमुख, किशन कल्याणकर, संतोष मुळे, नागनाथ गड्डम, विठ्ठल पाटील डक, प्रशांत तिडके, दिपक पाटील, संजय मोरे, राजू काळे, सुमित मुथा यांनी केले आहे.

टिप्पण्या