नांदेड. (प्रतिनिधी) पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नवीन नांदेडातील वाघाळा ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने ७ जून रोजी दुपारी नांदेड ते लातूर राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाशेजारील पेट्रोल पंपाच्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्यावतीने वाढविण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या निषेधार्थ वाघाळा, नांदेड ब्लॉक काँग्रेसच्या वतीने ७ जून रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी १२ वाजेदरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाशेजारील पेंसलवार पेट्रोल पंपासमोर केंद्र सरकार अर्थात नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.
या धरणे आंदोलनादरम्यान, काँग्रेसच्या उपस्थित सर्व पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेल तसेच गॅसच्या दरवाढीचा निषेध असो, 'मोदी सरकारचा धिक्कार असो' 'वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल', 'नरेंद्र मोदी हाय-हाय', 'मोदी चाय बेचो, देश नहीं, देश नहीं' आणि 'पेट्रोल डिझेल तुम आगे बढो, गॅस तुम्हारे साथ है' अशा विविध जोरदार घोषणा देवून परिसर दणाणून सोडले. 'वाघाळा' ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात युवा कार्यकर्ते राहूल हंबर्डे आणि वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष विनोद कांचनगिरे यांचेसह नांदेड,वाघाळा शहर महापालिकेच्या माजी नगरसेविका अनुक्रमे- डॉ. करूणा जमदाडे, प्रा. डॉ. ललिता शिंदे- बोकारे, माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड, संजय मोरे, उदय देशमुख, डॉ. नरेश रायेवार, शेख मोईन लाठकर, प्रमोद टेहरे, राजू लांडगे, एड. प्रसेनजीत वाघमारे, प्रा. डॉ. रमेश नांदेडकर, शेख असलम, भि. ना. गायकवाड, एस.पी. कुंभारे, के.एल. ढाकणीकर, भुजंगराव स्वामी, पिंटू पाटील, संजय श्रीरामे, सुनिता राठोड, अनिता गजेवार, कविता चव्हाण, त्रिशला कांबळे, विमल चित्ते, विजया काचावार, सुमन पवार तसेच वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
दरम्यान, उपरोक्त धरणे-आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडू नये म्हणून, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पो.नि. अशोक घोरबांड, सपोनि. विश्वजीत कासले, पोउपनि. गोविंद खैरे व व्हि. के. नरवटे यांच्यासह विशेष शाखेचे नाईक पो.कॉ. संजय जाधव, तानाजी चाटे तसेच त्यांचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांनी उपरोल्लेखित धरणे तथा आंदोलनस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

COMMENTS