*उदगीर* : *नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळ उदगीरच्या वतीने कर्तव्यदक्ष नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत प्रभाकर राठोड यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त उदगीर शहर व परिसरात विविध उपक्रमाच्या माध्यमातून 08 जुन ते 14 जून 2021 पर्यंत सेवासप्ताहाचे आयोजन नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे संस्थापक नवनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे*.
*खालील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत* *त्यात वृक्षारोपण व वृक्ष वाटप, बेघर व निराधार व्यक्तींना जेवण व ब्लँकेट वाटप, तृतीयपंथी यांना* *अन्नधान्य वाटप, गरजू व गरीब महिलांना साडीचोळी वाटप*, *लेबर, गरजू व गरिबांना अन्नधान्य किट वाटप, विधवा महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे* *वाटप व* *दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य वाटप असे विविध उपक्रम* *मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे*. *तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे*
*असे आव्हान अजमत खान, प्रा. मदन पाटील, बळवंत चिंचोलकर, मधुकर वाघमारे, इंजि. आकाश झिल्ले, दत्तात्रय काळोजी, दयानंद पाटील, विशाल गायकवाड व नवनाथ गायकवाड मराठवाडा मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे*
COMMENTS