धर्माबाद (अहमद लड्डा) शेतात तुर कापणी करत करताना अचानक रानडुक्कराने दि.२०जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजता शेतात काम करताना हल्ला केल्याने मजुरदार सुनिता सिरसे हि महिला गंभीर झाली.त्यामुळे परिसरात शेतात काम करणा-या महिला मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धर्माबाद तालुक्यातील येताळा येथील मजुरदार महिला सुनिता लक्ष्मण सिरसे वय ३८ हि महिला गंगाधर सुर्यवंशी यांच्या शेतात तुर कापणीसाठी ३ ते ४ मजुरदार महिलासह गेली असता अचानक रानडुक्कराने सुनिता हिच्या वर हल्ला केला,त्यात उजव्या पायाच्या मांडीची मासाचा गोळा बाहेच काढल्याने गंभीर जखमी झाली.यावेळी इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने भीतीने रानडुक्कर पळ काढला अन्यथा सदरील महिला अती गंभीर जखमी झालीच असती व इतर महिलांवर पण हल्ला झाला असता.सदरिल मजुरदार महिलेला शासकीय रुग्णालय धर्माबाद येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय पोहरे यांनी उपचार करुन नांदेड येथील दवाखान्यात हलविण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच वनविभाग यांनी पंचनामा केला.जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.
या घटनेमुळे शेतात काम करणा-या महिला मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS