नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
मुखेड तालुक्यातील परतपुर येथिल जनशक्ती ग्रामविकास पॅनल प्रमुख माजी सरपंच शिवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच झालेल्या परतपुर येथील ग्राम पंचायत निवडणूकीत ७ पैकी ५ उमेदवार विजयी होत सलग चौथ्यांदा वर्चस्व स्थापित करण्याची परपंरा कायम राखली आहे.
मुखेड तालुक्यातील परतपुर येथील ग्राम पंचायत निवडणूकीसाठी तीन प्रभागासाठी जनशक्ती ग्रामविकास पँनल प्रमुख शिवराज पाटील व विरोधी गटाचे प्रत्येकी ७ असे १४ उमेदवार निवडणूकीच्या आखाडयात उभे केले होते.हि लढत मोठ्या काटयाची झाली होती.पण गेल्या विस वर्षात गावात रस्ते,पिण्याचे पाणी,लाईट,गरीब गरजु लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या माध्यमातून शिवराज पाटील यांनी लाभ मिळून दिल्यामुळे मतदारानी जनशक्ती व विकास कामाचे जोरदार समर्थन करीत मतदान केल्यामुळे
भाजपाचे व्यंकटराव पाटील गोजेगावकर गटाचे जनशक्ती ग्रामविकास पँनल प्रमुख शिवराज पाटील व पिटु पाटील यांचे ७ पैकी शिवराज पाटील,गिण्याणबाई धमणे,जयश्री चव्हाण,सुर्यकांत टाळीकुटे,भारतबाई टाळीकुटे हे ५ उमेदवार बहुमताने विजयी झाले तर विरोधी गटाला दोनवरच समाधान राहावे लागेल.जनशक्ती विकास पँनल प्रमुख शिवराज पाटील यांनी एक हाती सत्ता कायम ठेवत सलग चौथ्यांदा ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व स्थापित केले आहेत.

COMMENTS