मुंबईतील माहुल येथील एजिस लॉजिस्टिक कंपनी लिमिटेड मधील कामगारांना प्रत्येक महिन्याला 5500 रुपये भरघोस पगारवाढीचा वेतन करार मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली 21 जानेवारी 2021 रोजी झाला. कराराचा कालावधी 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2020 असा तीन वर्षांचा असून 1 जानेवारी 2021 पासून पुन्हा नवीन वेतन करार लागू होणार आहे. कामगारांना तीन वर्षांची थकबाकी मिळणार आहे.
वेतन करारावर मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये, सेक्रेटरी विद्याधर राणे, खजिनदार विकास नलावडे यांनी युनियनच्या वतीने, कमिटी मेंबर जे. ए. तावडे, के. एम. तरे, मोहन साखरे, डी. एल. बोऱ्हाडे, अनंत रामन यांनी कामगारांच्या वतीने तर व्यवस्थापनाच्या वतीने ऑपरेशन आणि प्रोजेक्टचे अध्यक्ष के . एस. सावंत, वरिष्ठ उपाध्यक्ष एन. एस. जे. राव, एच. आर. अँड ऍडमिनिस्ट्रेशनचे उपाध्यक्ष गिरीश गुरखे, डेप्युटी जनरल मॅनेजर प्रवीण जागडे यांनी वेतन करारावर सह्या केल्या.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS