केज दि २६(प्रतिनिधी) शहरालगत असलेल्या सरस्वती महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागांतर्गत चालताबोलता योगा, हस्तमुद्रा कार्यक्रम घेण्यात आला. क...
केज दि २६(प्रतिनिधी)
शहरालगत असलेल्या सरस्वती महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभागांतर्गत चालताबोलता योगा, हस्तमुद्रा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी बी पाटील ,योगा मार्गदर्शक सूरज वाघ,प्रमुख उपस्थिती एच बी सौदागर, प्राचार्य व्ही आर शिनगारे,प्रा डॉ मधुकर चाटे, आदींची होती
यावेळी वाघ यांनी चालता-बोलता योगा प्रात्यक्षिक दाखवले शरीरासाठी योगाचे महत्त्व विशद केले. विविध हस्तमुद्रा करून आपण शरीराचे व्यायाम करू शकतो. आयुर्वेदाचा वापर जास्त जास्त करून आयुर्मान वाढवता येते. असे मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ जे के जाधव तर आभार प्रा डॉ ज्योती गायकवाड यांनी केले कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS