भाजपा नेते ज्ञानेश्वर मेंडके हे कायम सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर असतात. त्यांच्या याकामाची पावती म्हणून त्यांना दिर्घायुष्य लाभावी या करिता कोरोनाच्या पार्श्वभुमिवर अनावश्यक खर्चाला फाटा देत स्वराष्ट्र मित्र मंडळ व कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. शुक्रवार दि.25 रोजी शहरातील ठक्कर बझार येथे स्वराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराचे उद्घाटन वैद्यकिय अधिक्षक डॉ.सुरेश साबळे, डॉ.अनिल परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरात 101 रक्तदात्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले. तसेच ग्रामीण रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. पालवरील गरजुंना गारव्यापासून बचावासाठी ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश शेटे, नारायण मेंडके, मदन पांढरे, बाळासाहेब गायकवाड, वैजनाथ चव्हाण, दिलीप सोळंके, बबनराव सुरवसे, जकी इनामदार, रामेश्वर चुंबळे, सुनील मोगरकर, दत्ता जाधव, ज्ञानेश्वर पवार, श्रीकांत मेंडके, राजेश मेंडके, सातलींग खिलारे, काशिनाथ बागडे आदीसह स्वराष्ट्र मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले दरम्यान ज्ञानेश्वर मेंडके यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष विलास नेमाने श्यामसुंदर पांचाळ लक्ष्मीकांत जांगिड बाळासाहेब गायकवाड राजेश मेंडके यांची उपस्थिती होती

COMMENTS