स्काऊट गाईड तर्फे राष्ट्रीय एकता दिवस साजरा.


 


लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी.


    


धर्माबाद (अहमद लड्डा) नांदेड भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय वजीराबाद, नांदेड येथे आज स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त "राष्ट्रीय एकता दिवस" साजरा करण्यात आला.


   तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त "राष्ट्रीय संकल्प दिन" साजरा करण्यात आला.   


     यावेळी सरदार वल्लभभाई पटेल व स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस जिल्हा सहचिटणीस श्रीमती एम.बी.झाडबुके व श्रीमती बी.एम.बच्चेवार, श्री पी.एम. कुलकर्णी, स्काऊट विभागाचे जिल्हा संघटक दिगंबर करंडे गाईड विभागाच्या जिल्हा संघटक श्रीमती शिवकाशी तांडे, कैलास कापवार, मयुर भाताडे व कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी शासनाच्या नियमाप्रमाणे कोविड-19 कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क चा उपयोग करण्यात आला .


यावेळी "मास ऑफ इंडिया "मास ऑफ महाराष्ट्र व मास ऑफ ऑल स्काऊट गाईड असा संदेश स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक दिगंबर करंडे यांनी दिला.


 स्काऊटर गाईडर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी उपस्थितांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.


टिप्पण्या