अतिवृष्टी पाऊसामुळे चांडोळा गटामधील झालेल्या पिकांसह घरांची सुद्धा नुकसान भरपाई द्या - सौ.सुशिलाताई बेटमोगरेकर


 


 ना.आशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली मागणी


 


 


मुखेड प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी


 


तालुक्यासह चांडोळागटामध्ये सलग दोन-चार दिवसापासुन सतत होत असलेल्या दमदार अतिवृष्टी


पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह अनेक गोरगरिब जनतेच्या घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.


या अतिवृष्टी पावसामुळे बेटमोगरा,उच्चा,माऊली,खतगाव,सलगरा,धामणगाव, चांडोळा अशा ग्रामिण भागातील नदी काठी असलेल्या हजारो एकर जमीन पुरामुळे गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिंकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन अनेक गोरगरिबांच्या सुद्धा पाण्याने घरे पडल्याचे दिसुन येत आहे.


 


यंदाचा खरिप हंगाम चांगला जाईल,अशी आशा शेतकऱ्यांना होती.या आशेवरच त्यांनी शेतीचे नियोजन केले होते. मात्र अॉगस्ट महिन्यापासुनच पावसाने शेतकऱ्यांच्या सुड घेत मुग,उडीद सारख्या हाताला आलेल्या पिकांचे नुकसान संपले नसुन आता सलग दोन-चार दिवसापासुन होत असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे सोयाबीन सारख्या अनेक पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत पुन्हा भर पडली आहे.


 


चांडोळा गटामध्ये पावसामुळे झालेल्या पिकांचे व अनेक गोरगरिब जनतेच्या घरांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची महिला व बालकल्याण सभापती सौ.सुशिलाताई हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी बाधित परिसराची पाहनी करुन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांसह अनेक गोरगरिब जनतेच्या घरांची सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री ना.आशोकराव चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.


टिप्पण्या