*लॉकडाऊनमध्ये टीम धनंजयची साथ 7*

*लॉकडाऊनमध्ये टीम धनंजयची साथ 7*



#जोशींचीतासिका


 


जगात कोरोनामुळे हाहा:कार उडाला आहे. एरविला स्वतःला सुपर हिरो म्हणून प्रोजेक्ट करणारे भलेभले राजकारणी बिळातसुद्धा शोधूनही सापडत नाहीयेत. अशावेळी "सेवा परमो धर्म" हे ब्रीद अवलंबत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे स्वतः व त्यांची टीम या अडचणीच्यावेळी ग्राऊंड झिरोवर जनसामान्यांसाठी २४X७ कार्यरत आहे.


 


SBI मधील काही कर्मचारी ४ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर पुढील ३ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करू विक्रमी १५०० जणांचे Swab Test करून घेतले. तसेच सध्याही रॅपिड अँटीजेन टेस्टचा वापर करून हजारो लोकांची तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे प्रशासक म्हणून आदेश असले तरी शासन म्हणून पालकमंत्री ना. धनंजय मुंडे सातत्याने "मिशन झिरो"साठी फ्रंटफुटवर येऊन कार्यरत आहेत. 


 


त्यांचे कोरोनातील अजून उल्लेखनीय कामगिरी म्हणजे देशभरात ऊसतोडणीसाठी गेलेल्या बीड जिल्ह्यातील सुमारे दीड लाख ऊसतोड कामगारांची सुरक्षित घरवापसी.


 


*अनाथांचे नाथ प्रतिष्ठान*


 


अनाथांचा नाथ हे विशेषण सुखकर्ता दुखहर्ता गणेशास वापरले जाते. लॉकडाऊनमुळे पिचलेल्या परळी वैजनाथ मतदार संघातील नागरिकांसाठी लाखो अन्नधान्य / किराणा किट वाटप केले. ईदनिमित्त तब्बल २० हजार शिरखुरमा किट वाटपसुद्धा नाथ प्रतिष्ठानने केले आहे. 


 


या अन्नयज्ञासोबत आरोग्ययज्ञही नाथ प्रतिष्ठनाने पार पाडत आहे. सुमारे सव्वा लाख नागरिकांच्या थर्मोस्कॅन चाचण्या मोफत करून दिल्या. अचानक लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचा भाजीपाला जागेवर खरेदी करून त्याचे वाटप गरजूंना केले गेले. डॉक्टर मंडळींना तसेच सरकारी दवाखान्यास मोठ्या प्रमाणावर PPE किटचे वितरण केले आहे. यांसह मास्क फेस शिल्ड, अत्यावश्यक सेवांच्या ठिकाणी सॅनिटायजर आदींचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले आहे.


 


नाथ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक वाल्मिक कराड, सचिव नितीन कुलकर्णी तथा इतर विश्वस्त कोरोनाकाळात गरजवंतांसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत त्यामुळेच "अनाथांचे नाथ" हा शब्द योजला आहे.


 


*सेवा परमो धर्म:!*


 


यात महत्त्वाची बाब म्हणजे जनता जनार्दनाची "सेवा" करताना स्वतः ना. धनंजय मुंडे व त्यांचे काही सहकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे त्या सर्वांनी कोरोनाच्या छाताडावर पाय ठेऊन पुन्हा लोकसेवेत स्वतःला झोकून दिले आहे.


 


माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनंत इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व ना. धनंजय मुंडे या दोघांच्या जन्मदिवसानिमित्त "सेवा सप्ताह" आयोजित केला होता. 


 


या सेवा सप्ताहात "कोरोना मदत कक्ष" स्थापित केला होता. यात अत्यावश्यक सेवेतील कोविड योध्याना कोरोशी दोन हात करायला लागणारी साधनसामग्री जसे की मास्क, सॅनिटायजर, पल्स ऑक्सिमिटर, थर्मोस्कॅन मशीन आदींचे मोफत वितरण करण्यात आले. तसेच आवश्यक ठिकाणी पॅडल सॅनिटायजर मशीनसुद्धा दिल्या जात आहेत.


 


लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर छपाईचे संकट ओळखून "पुस्तकरथ" चालवून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुस्तके गोळा करून गरजूंना वाटप केले जात आहे.


 


"कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये जशी शारीरिक सुरक्षा महत्त्वाची आहे तशी मनाची मशागत अत्यावश्यक आहे." हे नेमके हेरून सेवा सप्ताहात "एक्सप्लोरिंग परळी वैजनाथ, वक्तृत्व, नृत्य, गायन, वादन, वृक्ष संवर्धन" आदी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला.


 


*कार्यक्षम अनंत*


 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असूनही पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन अनंत इंगळे सामाजिक कामात सक्रिय असतात. याचीच प्रचिती या लॉकडाऊनमध्येही आली.


 


कोरोनाकाळात रस्त्यावर कोरोनाशी लढण्यासाठी लागणारे संदेश स्वखर्चाने चित्तारून घेतले.


 


अनंत इंगळे यांनी वाढदिवसानिमित्त अन्नधान्य किट, सॅनिटायजर, मास्क वाटप केले. तसेच शुभेच्छा देणाऱ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून वृक्षभेट दिली. सोबतच रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रमदेखील राबविला.


 


*सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ राधामोहन प्रतिष्ठान*


 


राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा राधामोहन प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा चंदूलालजी बियाणी यांनी गेल्या पाच महिन्यांत मास्क, सॅनिटायजर वाटप केले.


 


बेघर तसेच अत्यावश्यक सेवेतील मंडळींना अन्नछत्राद्वारे दोन वेळेचे जेवण उपलब्ध करून दिले. होमिओपॅथीच्या आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप असो किंवा कंटेंमेंट झोनसाठी लागणारे पत्रे, बांबू आदी साधनसामुग्री नगरपालिकेस वेळीच उपलब्ध करून दिली.


 


सोबतच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य असल्याने वेळोवेळी जिल्हा तसेच उपविभागीय प्रशासनास चंदूलालजी बियाणी वेळोवेळी मौलिक सूचना करत असतात.


 


*ज्ञानचैतन्य*


 


सेवा सप्ताहात नगरसेवक चेतन सौंदळे यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ जुलै ते २२ जुलै दरम्यान वॉट्सअॅपद्वारे १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच १ मे २०२० रोजी दहावीचा कलचाचणी अहवाल www.mahacareermitra.in या वेबसाईटवर व mahacareermitra app वर जाहीर करण्यात आला आहे. तेव्हा विद्यार्थी आपला कल व अभिक्षमता अहवाल याविषयी समुपदेकांनी विनामूल्य मोबाईलद्वारे संपर्क साधून करिअर क्षेत्राविषयी माहिती दिली.


 


तसेच महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.


 


*कोरोनात शिक्षणयज्ञ पेटवणारा दीपक*


 


संस्कार शाळेचे सर्वेसर्वा दीपक तांदळे यांनी सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांना "नवनीत टॉप स्कोरर" हे सॉफ्टवेअर मोफत दिले आहे. सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांना याचा लाभ ह्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात होणार आहे. यासाठी तब्बल ७ लाखांचा खर्च विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी केला आहे. 


 


यांसह स्वतः दीपक तांदळे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांचा धनादेश ना. धनंजय मुंडे यांना हस्तांतरित केला होता.


 


*कोरोनातला दीपस्तंभ*


 


माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख हे टीम धनंजय मधील किंवा कदाचित राज्यातील पहिले राजकीय व्यक्ती होते ज्यांनी मार्च महिन्यातच मास्क वाटप तर केलेच पण मोबाईल सॅनिटायजर व्हॅन तयार करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले.


 


*कोरोनाची शिकार करणारे पारधे*


 


सेवा सप्ताहात सेवारुपी कर्तव्य स्वच्छता व आरोग्य सभापती किशोर पारधे यांनी बजावले. शहरातील जवळपास सर्व गल्ल्या त्यांनी सॅनिटाईज अर्थात निर्जंतुक करून घेतल्या.


 


*वैविध्यपूर्ण मनजीत*


 


राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेल परळी वैजनाथचे अध्यक्ष विधिज्ञ मनजीत सुगरे यांनी स्थलांतर करताना अनवाणी लोकांना होणारा त्रास बघून त्यांना पादत्राणे वाटप केले.


 


तसेच गरजूंना स्व. पंडितअण्णा मुंडे शेतकरी भोजनगृहा मार्फत मोफत अन्नदान केले.


 


निसर्गाशी बांधिलकी म्हणून वृक्ष संवर्धन असे विविध उपक्रम राबविले. यापुढेही काही उपक्रम हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे.


 


*प्लाझ्मावीर प्रशांत*


 


ना. धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी हे स्वतः कोरोनाबाधित झाले होते. मात्र, त्यावर मात केल्यानंतर ना. धनंजय मुंडेंच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी बीड जिल्ह्यातील पहिले प्लाझ्मा डोनेशन केले ज्याचा उपयोग इतर कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी केला जात आहे.


 


*आरोग्यदूत राजेंद्र*


 


लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा चालविण्यासाठी विविध गाड्या चालवणारे वाहक (ड्रायव्हर) मंडळींचे आरोग्य सुदृढ रहावे म्हणून नगरसेवक राजेंद्र सोनी यांनी फेसशिल्ड तसेच इतर कोरोना प्रतिबंधक साहित्य वाटप केले.


 


*प्राणवायू दाता संतोष*


 


राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा ना. धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी शहरातील काही छोटेखानी दवाखान्यांना ऑक्सिजन सिलेंडर वाटप केले आहे. सोबत या संकटसमयी त्यांची अव्याहत रुग्णसेवा सुरूच आहे.


 


*पोलिसमित्र सुरेश अन योगेश*


कोरोनाशी लढताना पोलिसांना कधीकधी उपाशी राहण्याची वेळ येते त्यामुळे विधिज्ञ सुरेश सिरसाट व योगेश नानवटे या जोडगोळीने सात दिवस पोलिसांच्या कर्तव्य ठिकाणी जाऊन मोफत नाश्ता व चहा पोहचवला. 


 


विशेष म्हणजेे वरील हे सर्व उपक्रम होत असताना संपूर्णपणे शारीरिक आंतरपालन / सामाजिक सोवळे / सोशल डिस्टनसिंगचे पालन केले गेले. तसेच सर्व ठिकाणी स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून उपक्रम सुरू होते / आहेत व राहतील असा विश्वास जनसामान्यांना वाटतो.


 


राजकीय तथा सामाजिक क्षेत्रात कार्यरत मंडळींनी एक गोष्ट मनावर कोरून ठेववी "कठीण समय येता जो कामास येतो त्यास जनता सहाय्यास येते".


 


सध्या कोणताही निवडणूक हंगाम नाही पण स्वःत ना. धनंजय मुंडे व त्यांचे सहकारी निर्व्याजपणे काम करत आहे. त्याचे योग्य ते कर्मफळ त्यांना मिळणार म्हणजे मिळणारच याची खात्री वाटते.


 


ना. धनंजय मुंडे व त्यांच्या सर्व कोविड योध्यांना या संकटसमयी सक्षमपणे व निरोगीपणे लढण्याचे बळ मिळो ही प्रभू वैद्यनाथ चरणी प्रार्थना.


 


#COVID19 #COVIDDiaries #सेवापरमोधर्म: #TeamWork #साथसाथ #साथ७ 


 


जय हिंद,


अनिरुद्ध जोशी, परळी वैजनाथ


चलभाष क्र. 7385533171 / 8983555657


दि. २० ऑगस्ट २०२०


 


टीप : 


१. सेवा कार्य करून काही मंडळींचा उल्लेख अनावधानाने राहिला असल्यास त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त करतो.


 


२. इतर राजकीय पक्षातील किंवा अशासकीय संस्थानी (NGO) आदींनी कोरोनाकाळात केलेले कार्य याबाबतचा सविस्तर आढावा पुढील काही तासिकांत घेतला जाणार आहे.  


 


३. ही तासिका स्पॉन्सरड आहे असे समजणाऱ्या महानगांना ईश्वर सद्बुद्धी देवो.


टिप्पण्या