संकटात खंबीरपणे मित्रास साथ देणारे"मित्रअवलिया" म्हणजे व्यास भगवान महाराज यांना अभिष्टचिंतन!


कंधार:


कंधार शहरातील भवानी नगरात वास्तव्यास असलेले धार्मिक अन् सामाजिक सेवाभाव वृतीचे सदा हसतमुख राहणारे व्यक्तीमत्व आणि मित्र संकटात असतांना स्वतः ढाल बनुन संकट स्वतःवर आहे असे समजून मैत्री खंबीरपणे निभावणारे "मित्र अवलिया"


म्हणजे आदरणीय भगवानरावजी व्यास महाराज. त्यांना रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्यासाठी शिलापुजनाच्या कार्यक्रमात त्यांना पाहिले होते.तो काळ 1992 चा कालखंड त्यावेळी माझे काॅलेज जीवन होते.


त्यांचे मुळगांव सल्लाडा ता.सलूम्बर जि.उदयपुर राजस्थान राज्यातले व्यास परिवार पुर्वज कंधार नगरीत त्यांचे आजोबा इ.स 1905 मध्ये त्यांचे आजोबा कंधारपुर नगरी उपजीविकेसाठी अत्यंत कठिण परिस्थितीत आले होते. 


त्यांच्या आजोबाचा मृत्यू इ.स.1935 ला कंधार नगरीच मृत्यु झाला. इथल्याच मातीत विलीन झाले, 


भगवान महाराज यांचा जन्म इ.स.1954 चा आणि शिक्षण कंधार या नगरीत च झाले ,आज मोठ्या आनंदाने व प्रेमाने त्यांची पाचवी पिडी अगदी गुण्या गोविंदाने राहत आहे.


त्यांच्या पूर्वजांना जन्म भूमि सोडावी लागली चे शल्यत्यांच्या मनात तर आहेच!


जैसे एखाद्या बाळाच्या नशिबी त्याच्या आईचे सुख नसावे.अन् मावशी ने मोठ्या लाडाने मोठे करावे.आणि प्रत्येक हट्ट पुरवत मावशीने जन्मदात्या आईची उनिव भासू दिली नाही.


असेच असीम प्रेम या मराठी माय भूमि मावशीने दिले आहे.मराठी मुलखाच्या अंगा खांद्या वर खेळत मोठे झाले अनेक व्यवसाय करत पारिवारीक जीवन आनंदाने जगतांना जन्मभूमीचा जणू विसरच पडला.कंधार नगरीने त्यांच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत.


 आदरणीय डॉ.भाई केशवरावजी धोड़गे सहेबांचे अनेक ऐतिहासिक आंदोलने व सत्याग्रह(हगु मुतु, शेण चारु, पौळ रचू , खुर्ची बळकावू सारखे अनेक सत्याग्रह, मोर्चे, अंदोलनाने पाहिली आहेत.मन्याड खोर्यातील पहिलवान भाई झोंटिंगराव पा.मुंडे यांच्या लाल बावटा ,लाल रंगाची काठी (दंडूका) आदरणीय केशवरावजींच्या हातांचा मुलायम स्पर्श त्यांच्या ह्रदयालयात कोरलेलाच आहे.


 सहसा प्रत्येक सोमवारी सत्याग्रह ठरलेला असायचा


 हलगिची ठरलेली घाई,आणि सगळ्यात पुढे जमीनी वर बसून भाषण ऐकन्याचा आनंद त्यांना शब्दात व्यक्त करण्यापेक्षा आठवणीत अवर्णनीयच वाटतो,.


असे अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.त्यांना भूतकालीन इतिहासाचा आजही अभिमानच वाटतो.


तर संघ शाखेत बाळु महाराजशाळेत आदरणीय तूळशीराम गुरुजी अम्बुलगेकर ,शंकरराव गुरुजी, चाँदोबा गुरुजी, रामराव गोलेगावकर, वासुदेवराव धर्मापुरिकर सर प्रधान मास्तर, गंगाधर मास्तर यांच्या अनेक आठवणी आज ही ताज्या आहेत.


सर्व जाती धर्मा च्या मित्रा नी व व्यापारी मित्रांनी भर भरून प्रेम केले व मान सन्मान दिला


प्रत्येक सुखा दुःखात सहभागी केले व झाले.


आदरणीय भगवानराव आजही त्यांच्या गावापेक्षा कंधार नगरीवर अधिक प्रेम करतात. त्त्यांचा व्यवसाय सुवर्ण व्यापाराचा बौध्दविहाराच्या बाजुला भाग्यलक्ष्मी ज्वलर्स आहे.ग्राहक दैवता सोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध दृढ करुन विश्वासार्हता टिकवली आहे.मैत्रीच्या स्नेहभावनेला मानाचा मुजरा! सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार


टिप्पण्या