पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बाराशे कोटी करा - आमदार प्रकाश सोळंके यांची पालमंत्र्यांकडे मागणी

 



माजलगाव /प्रतिनिधी 


    जिल्ह्यात एक लाख 87 हजार 850 शेतक-यांना 1120 कोटी रूपयांची कर्जमाफी झाली आहे. यावर्षीचे खरीप पिक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 960 कोटी रूपये असुन कर्ज माफीच्या तुलनेत उद्दीष्ट कमी आहे. त्यामुळे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बाराशे ते तेराशे कोटी रूपये करण्याची मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोमवारी ता. 20 केली आहे.


 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला 57 हजार शेतक-सांठी 232 कोटी रूपयांची कर्जमाफी मिळालेली असुन 20 जुलै अखेर बॅंकेने फक्त 12 कोटी 85 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले असुन फक्त 3470 शेतकरी समाविष्ट आहेत. स्टेट बॅंक आॅफ इंडियाच्या जिल्ह्यात 48 शाखा असून या शाखेव्दार आॅनलाईन पध्दतीने दरदिवर्शी फक्त विस शेतक-यांना कर्ज वाटप होत आहे. त्यामुळे कर्ज वाटपाच्या कामास विलंब लागत आहे. सदर बॅंकेस विशेष बाब म्हणुन आॅफलाईन पध्दतीने कर्ज वाटप करण्यास परवानगी द्यावी, डिएलसीने पिक कर्ज वाटपासंदर्भात ठरवुन दिलेल्या स्केल आॅफ फायनान्स प्रमाणे महाराष्ट् ग्रामीण बॅंक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक कर्ज वाटप करत नाहीत तसेच जिल्हाधिकारी यांनी वारंवार आदेश देउनही इतर बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र, सात बारा, फेरफार नक्कल आदि कागदपत्रे मागण्यात येत आहेत. त्यामुळे कर्ज वाटपावर परिणाम होत आहे. खरीप हंगाम 1 एप्रिल पासून सुरू होते परंतू प्रत्यक्षात जून महिण्यापासून पिक कर्ज वाटप करण्यात येते त्यामुळे दोन महिणे वाया जातात, पुढील वर्षी पासुन एप्रिल पासुन पिक कर्ज वाटप करावे जेणेकरून शेतक-यांना पेरणीच्या वेळेला पैसे उपलब्ध होतील. यासह अनेक मागण्यांचे निवेदन आमदार प्रकाश सोळंके यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिले आहे.


टिप्पण्या