दिंद्रुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा शेतकऱ्याच्या हस्ते शुभारंभ


 


माजलगाव (प्रतिनिधी) 


  भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांच्या प्रयत्नाने व माजी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे 2 कोटी 35 लाख रुपये किमतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र दिंद्रुड येथे मंजूर झालेले आहे. त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हस्ते सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून अतिशय साधेपणाने करण्यात आला. सदरील प्रा.आ.केंद्रामुळे परिसरातील असंख्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. 


         याबाबत अधिक वृत्त असे की, माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी व गरज होती. गावचे भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांनी वेळोवेळी स्थानिक पासून ते मंत्रालयापर्यत पाठपुरावा करून या कामाच्या मंजुरीला मूर्त स्वरुप दिले. 23 जुलै 2019 रोजी या प्रा.आ.केंद्राच्या बांधकामासाठीच्या निधीस मंजुरी मिळाली. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीस 3 कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.


             सदरील बांधकामास 4 सप्टेंबर 2019 रोजी पूर्णतः प्रशासकीय मंजुरी मिळाली. सदरील कामासाठी ओमप्रकाश शेटे यांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली. या कामाचे प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश मिळाल्या नंतर आज या बांधकामाचा शुभारंभ जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हस्ते करून त्यांनाही सन्मानित करण्यात आला. 


               यावेळी ओमप्रकाश शेटे यांच्यासह कामाचे गुत्तेदार सुहास सोळंके, वैजनाथ कटारे, बालासाहेब ठोंबरे, मधुकर कटारे, उस्मानखा पठाण, दत्तात्रय शिंदे, प्रदीप ठोंबरे, नागेश ठोंबरे, मारोती दुनगु, संतोष मुंडे, नागेश कानडे, अमीरखा पठाण, पांडुतात्या सोळंके, महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान, अर्जुनराव वनवे, भगवानराव कांदे, विलास शेंडगे, भागवत साबळे,बाबुराव खंडागळे आदी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मंडळीसह अधिकारी उपस्थित होते.


 


■ 


महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात काम करत असतांना मनात इच्छा होती की, माझ्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात दिनदुबळ्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी. आज त्या इच्छापूर्तीचा निश्चित आनंद आहे. गावकऱ्यांनी देखरेख करुन अंदाजपत्रकाप्रमाणे काम करुन घ्यावे.◾


- ओमप्रकाश शेटे


(माजी प्रमुख- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष)


टिप्पण्या