*वाणी,जंगम समाजाच्या जमिनीवर मठाधिपतीचा डोळा*

  • *सदर जागेची नोंद स्मशानभूमी म्हणून पूर्वीप्रमाणे घेण्याची मागणी*

  • सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी


सोनपेठ येथील दहीखेड शिवारातील मालमत्ता क्रमांक २२३ मधील ६७ गुंठे जमिनीचा वाद चव्हाट्यावर आला असून दोनच दिवसापूर्वी सोनपेठ येथील समाजाच्या काही लोकांनी एकत्र येऊन स्मशानभुमीसाठी वाढीव जागा देण्याची मागणी सोनपेठचे तहसीलदार डॉ.अशिषकुमार बिरादार यांच्याकडे केली होती.त्यापूर्वी या मठाचे मठाधिपती नंदकिशोर शिवाचार्य यांनी पूर्वी स्मशानभुमीसाठी राखीव असणाऱ्या जागेवर व सध्या समाधिस्थळ म्हणून समाजात ओळख असणाऱ्या जागेची नोंद दुरुस्त करत श्री नंदीकेश्वर स्वामी मठ संस्थान सोनपेठ अशी करण्याचा अर्ज तहसीलदार यांच्याकडे दिला आहे.यामुळे सोनपेठच्या वाणी,जंगम,लिंगायत समाजाच्या नागरिकांनी सदर जागेची स्मशानभूमी म्हणूनच नोंद करण्याची मागणी तहसीलदार यांच्याकडे आक्षेप अर्जाद्वारे केली आहे.या सर्व प्रकारामुळे या जागेचा अर्थिक मलीदा लाटण्याच्या विचारात असणाऱ्या मठाधिपती नंदीकेश्वर शिवाचार्य यांचे पितळ उघडे पडले आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,सोनपेठ तालुक्याच्या मध्य वसाहत क्षेत्रात वाणी,जंगम समाजाची पूर्वीपासूनची स्मशानभूमी कार्यान्वित आहे.याच स्मशानभूमीत समाजातील मयताचे अंत्यसंस्कार झालेले आहेत.त्यांच्या याठिकाणी समाध्या आहेत मात्र "सब भूमी गोपाल की"अशा आवेशात संध्या सोनपेठचे नंदकिशोर शिवाचार्य आपल्या अध्यात्मिक पणाचा धाक दाखवून जमीन लाटण्याचा इरादा ठेवत असल्याचा आरोप समाजातील प्रतिष्ठितांनी निवेदनाद्वारे केला आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,शहरातील या जमिनीवर मठाधिपती यांचा पूर्वीपासून डोळा असून त्यांनी या जागेवर व्यापारी संकुल उभारत दरवर्षी येणारे सहा लाख रुपयाचे उत्पन्न गिळंकृत केले आहे.असे करूनही सदर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना"जब सैय्या कोतवाल तो!डर काहे का?"अशा म्हणधार्जीन्या वृत्तीने झपाटलेल्या मठाधिपती यांनी आपल्या शिष्यामार्फत नाव बदलण्याच्या मागणीचा अर्ज दिला आहे.या अर्जावर आक्षेप दाखल करत असताना सदर जागेची नोंद सरकारी परमपोक अशी आहे.तर इतर हक्कात जंगम,वाणी लोकांची समाधी(नंदीकेश्वराची)असा उल्लेख असतांना सदर जमीन मठाच्या नावाने करत मलीदा लाटण्याचा इरादा असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.निवेदनावर शैलेश महाजन,शिवहार गव्हाने,पत्रकार अतुल कोरपे,भागवत पोपडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


टिप्पण्या