*अपंग प्रशिक्षण केंद्रातील कनिष्ठ लिपिक उत्तम मिसाळे 5 वर्षापासून पगारापासून वंचित!*

                प्राध्यापक गोणारकर यांनी वाचवले मिसाळे यांचे प्राण!                                                                 धर्माबाद-(अहमद लड्डा)- धर्माबाद येथील श्री तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी ग्रामीण अपंग संमिश्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात कनिष्ठ लिपिक म्हणून गेल्या सव्वीस वर्षापासून सेवेत असणाऱ्या उत्तम ईरवंतराव मिसाळे यांची पगार गेल्या पाच वर्षापासून न काढणाऱ्या व अतिशय नियमबाह्य पद्धतीने दादागिरी करणाऱ्या संस्था चालक  संतोष जोशी यांच्या कृत्याला कंटाळून उत्तम मिसाळ यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता प्राध्यापक बीएम गोणारकर यांनी त्यांना परावृत्त केले असले तरी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे .           उत्तम मिसळे हे उपरोक्त संस्थेत प्रदीर्घ काळापासून सेवा बजावताना सन 2015 साली त्यांच्यावर फार मोठा आघात झाला. शेजारच्या तेलंगणा राज्यात सन 2015 पूर्वी घडलेल्या एका खून खटल्यात अचानक आकसापोटी त्यांचे नाव सहआरोपी म्हणून आले होते. दिनांक 18 12 2015 रोजी त्यांना तेलंगाना पोलिसांनी अटक केली. तीन महिने निर्मल जिल्ह्याच्या मध्यवर्ती कारागृहात राहिल्यानंतर दिनांक 28- 3 -2016 रोजी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तब्बल पाच वर्षे न्यायालयाच्या पायऱ्या झिजविला नंतर 17 मार्च 2020 रोजी तेलंगणातील निर्मल सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. दरम्यानच्या काळात सन 2016 मध्ये एप्रिल ते जुलै असा पाच महिन्याचा पगार त्यांना भेटला व त्याच दरम्यान संस्थाचालकांनी भावनेच्या भरात आणून उत्तम मिसाळे यांच्याकडून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज लिहून घेतला. पण आज तागायत ह्या प्रक्रियेसंदर्भात कोणतीच कार्यवाही त्यांनी केली नाही. व उत्तम मिसाळे यांना ह्या पाच वर्षात  संस्थेची प्राचार्याची वा समाज कल्याण विभागाची लेखी नोटीस वा सूचना आली नाही जेणेकरून मिसाळे यांची सेवा खंडित झाली का निलंबन केले असे सूतोवाच निघत नसतानाही संस्थाचालक संतोष जोशी यांनी नियमबाह्य पद्धतीने उत्तम मिसाळे यांचा पगार गेल्या पाच वर्षापासून रोखून धरल्यामुळे न्यायालयाच्या प्रदीर्घ लढा जिंकल्यानंतरही आर्थिक विवंचनेत सापडलेले उत्तम मिसाळे यांच्या मनात आत्महत्येचे विचार येणे सहाजिकच आहे. तसा त्यांनी विचार बोलून दाखवल्यामुळे धर्माबाद नगरपालिकेचे राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता प्राध्यापक बीएम गोणारकर यांनी त्यांना त्या गोष्टी पासून परावृत्त करुन त्यांचे प्राण वाचवले.                                                       दिनांक 17 मार्च 2020 रोजी लागलेल्या न्यायालयाच्या निकालाची प्रत घेऊन उत्तम मिसाळे नांदेडला संस्थाचालक संतोष जोशी कडे गेले. आता जुलै महिना उलटला तरी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे अगोदरच कर्जबाजारी झालेले व कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेले उत्तम मिसाळे व कुटुंबीय ज्यात आई पत्नी दोन मुले व एक मुलगी आहे ते सर्व नैराश्यात  जीवन जगत असून ह्या जगण्याला काहीच अर्थ नाही असा सामूहिक आत्महत्येचा सूर त्यांच्या कुटुंबियातील निघत आहे. **प्रतिक्रिया -(प्राध्यापक भोजराम गोणारकर)- उत्तम मिसाळे व त्यांचे कुटुंब अतिशय नैराश्यात जीवन जगत असून काही अघटित घटना घडली तर सर्वस्वी संस्थाचालक संतोष जोशी समाज कल्याण विभाग व संस्थेचे प्राचार्य दोषी राहणार आहेत असे एकूण अभ्यासाअंती समजत आहे.                             


 ◼️ उपरोक्त सर्व पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रतिनिधीने थेट संस्थाचालक संतोष जोशी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असता वकिलांचा सल्ला घेऊन योग्य ते निर्णय घेऊ असे मोघम उत्तर त्यांनी दिले.


टिप्पण्या