धर्माबाद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती कडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना उपक्रम राबवावे - मनसे अध्यक्ष - दत्तात्रय कावड़े.


 


धर्माबाद ( अहमद लड्डा) महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावड़े यानीं जिलाधिकारी श्री विपिन इटनकर ला पाठवलेल्या ई-मेल मध्ये धर्माबाद तालुक्याच्या सर्व ग्राम पंचायती मार्फ़त कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविन्यासाठी विनंती केली आहे। श्री कावड़े ने पुढे हे सांगितले की राज्याचे ग्राम विकास मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी ह्या वर्षी 14 व्या वित्त आयोगात, ग्रामनिधी ग्राम पंचायतीना कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेवर खर्च करण्यासाठी जी आर काढले आहे.पण धर्माबाद तालुक्यातील काहीं ग्रामपंचायत सोडले तर बाकीच्यां ग्रामपंचायती मध्ये हे उपक्रम राबविल्या जात नाही असे दिसून येते. ह्यासाठी जिल्हाधिकारी ह्या विषयी सक्तीने आदेशीत करावे, आता कोरोना ने तर ग्रामीण भागात ही शिरकाव केला असून येत्या पंधरा दिवसात ग्राम विकास मंत्री यांच्या आदेशाचे पालन करून जनतेच्या आरोग्याची सावधगीरी बाळगावी.कोरोना बाबत जनजागृती करून कोरोना प्रतिबंधात्मक उपकरने मास्क, सैनीटायजर व आर्सेनिक अल्बम 30 च्यां गोळ्यांचे ताबड़तोड़ ग्रामपंचायतीनी वाटप करव्यात, जनतेच्या हितासाठी असे परीपत्रक काढावे, अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय कावड़े यानीं जिलाधिकारी यांच्या कड़े केली आहे.


टिप्पण्या