पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाचे हिंगोली व नांदेडमध्ये छापे


73 लाख रुपयांच्या गुटख्यासह कोटी 3 लक्ष रुपयांचामुद्देमाल जप्त

 

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीसउपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी अंमलदारांना एकत्रित करूनहिंगोली  नांदेड शहरात चालणाऱ्या अवैधव्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठविले होते.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री तलेदवार  5 अंमलदारांचा समावेशअसलेल्या सदर पथकानेप्रथमत आज पहाटे हिंगोली जिल्ह्यातील बाळापुरयेथे कारवाई करततीन चारचाकी वाहनांमधून 14 लाख 67 हजार रुपयांचागुटखा जप्त केला असून नमूद प्रकरणात 10 लक्ष रुपयांची 3 चारचाकी वाहनेदेखील जप्त केली आहेतसदर बाबत आरोपी करण सदाशिव अवचारवय20 वर्ष,  राभोसी ताकळमनूरी जिहिंगोली व प्रभाकर दिगंबर अवचारवय32 वर्षराभोसी ताकळमनूरी जिहिंगोली यांचेविरुध्द पोलीस ठाणेआखाडा बाळापूर येथे गुरनं क्र. 26/2026 कलम 123,274,275, 323, 3(5) बीएनएस 26 (2), 27(2), 30 (2), 59 अन्न सुरक्षा मानके कायदा अन्वयेगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोनि श्री विष्णुकांत गुट्टेपोस्टे आखाडा बाळापुर हे करत आहेत.

 

उपरोक्त कारवाईनंतरसदर पथकाने नांदेड शहरातील इतवारा भागातगुटखा साठवलेल्या एका गोडाऊनवर कारवाई करून एकूण 58 लाख 26 हजार रुपयांचा गुटखा व माल पुरवणारा 20 लक्ष 50 हजार रुपयांचा एकट्रक असा एकूण 78 लाख 76 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असूनसदर गुन्हयात शेख जिबरान शेख मुखीदवय 26 वर्षरादेगलूर नाकाजिनांदेड व गणेश रामराव कऱ्हाळेवय 26 वर्षरातिरुपती नगरधनेगांवता.जिनांदेड या आरोपींना ताब्यात घेवून या संदर्भानेपोलीस ठाणे इतवारायेथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

वरील दोन्हीही ठिकाणांच्या छाप्यात पथकाने एकूण 72 लाख 93 हजाररुपयांचा गुटखा व चारचाकी वाहने व 1 ट्रक असा एकूण 1 कोटी 03 लाखरुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

सदर कारवाईत सपोनि श्री दशरथ तलेदवार यांचेसह पोहेकॉप्रदिपखानसोळेपोहेकॉ/संजीव जिंकलवाडपोकॉगणेश धुमाळपोकॉकामाजीगवळी यांनी सहभाग घेतला. सदर कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षकश्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी  अंमलदारांना 15,000 रुपयांचे बक्षीस घोषित केले आहेसदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठीआरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते का ?याचा शोध घेण्यात येत आहे.

 

आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहितीनागरिकांनी नजीकच्यापोली ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्याnandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर किंवा       ‘खबर 91 50 100 100 या हेल्पलाइनवर कळवून अशा अवैध व्यवसायांचाबिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावाअसे आवाहन नांदेड परिक्षेत्राचेपोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

टिप्पण्या