यशवंत ' मध्ये श्री.सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन*


नांदेड:( दि.१३ जानेवारी २०२६) 

               श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अध्यात्मिक शिक्षण समितीतर्फे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यान शिबिर संचालक श्री.सुरेश धूत संचालित विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी विविध ध्यानधारणा प्रयोगांचे प्रात्यक्षिक दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

               या उपक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे आणि प्रबंधक संदीप पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

               तरी या ध्यानधारणा उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन समिती समन्वयक व राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, सदस्य डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.दिगंबर भोसले, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.राजकुमार सोनवणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

टिप्पण्या