पीपल्स हायस्कूल येथे बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती

नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री कैलास तिडके यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. पुढे बोलताना ते म्हणाले बालविवाह झाला तर मुला मुलींचे आई-वडील नातेवाईक,आचारी, पुजारी,मंडपवाले यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकते, बालविवाहात सहभागी झाल्यास दोन वर्ष कैद  व एक लाख रुपये दंडही होऊ शकतो असे सांगून बाल विवाह होत असल्यास 1098 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले.   अध्यक्षीय समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक नितीन सेलमोकर यांनी बालविवाह थांबविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे सांगून  समाजातील प्रत्येक घटकाने त्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख व्ही. आर. चिलवरवार यांनी केले. याप्रसंगी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, सखी वन स्टॉप सेंटर येथील विधी अधिकारी ऍडव्होकेट एम एस थोटे यांनी कायदेविषयक ज्ञानाची माहिती करून दिली. याप्रसंगी योजना बच्चेवार, उषा कंधारे, मनीषा पालेपवाड, अरविंद काळे, मंजुषा वानखेडे, पुलावार, शिवराज कदम मनोहर राठोड, श्रद्धा सावले, अनिता गुंडेवार, मंगेश चाभरेकर, प्रशांत मारलेवाड, पवन रत्नपारखी, दीपिका यादव, माधव लुटे, श्री राम बोईनवाड यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या