पक्षाच्या जीवावर मोठे होऊन पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसाऱ्यांनी नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे बाप बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरून नाव वापरून मतदान मागण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवाराच्या प्रचार सभेत भूमिका मांडली.
देगलूर नाका भागातील प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार नूरबी. खाजाभाई. सरफराज पिंजारी यांच्या प्रचारात लिंबरा कॉलनी लिमरा कॉलनी. पाकीजा नगर. मेहबूबिया नगर या ठिकाणी झालेल्या सभेत स्थानिक बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे राहू असे आश्वासन या भागातील स्थानिक नागरिक मुक्तार भाई. सद्दाम भाई. शम्स फाउंडेशनचे अध्यक्ष शेख समशोद्दीन. गौस भाई. शब्बीर गुत्तेदार. समाजसेवक शेख कलीम. प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार गजानन हरकरे.गणेश पेन्सिलवार. शेअर प्रवक्ता नागनाथ महादापुरे यांची यावेळी उपस्थित होते. पहिल्यांदाच देगलूर नाका भागात शिवसेनेने तब्बल सात उमेदवार उभे केल्यामुळे विरोधकांना घाम फुटला. शेख कलीम मुल्ला यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची पावती येत्या पंधरा तारखेला मतदानाच्या स्वरूपात मिळणार असल्याची गवाई या भागातील सर्व नागरिकांनी दिली.

addComments
टिप्पणी पोस्ट करा