जानापुरी जि प शाळेत माता पालक मेळावा .

नांदेड दिं. 18 (प्रतिनिधी)लोहा तालुक्यातील जानापुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मकर संक्राती निमित्त माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात 

 संपन्न झाला. नंदाताई दिगंबर कदम ह्या कार्यक्रमाच्या 

अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.यावेळी क्रांती प्रल्हाद धुतराज, दिपाली दीपक लोखंडे, निर्मला गजानन राठोड, चित्रा किशोर पांचाळ,अश्विनी गजानन वानखेडे,कल्पना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


    प्रारंभी माता सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक बालाजी नरवाडे, विनायक देबडवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

  राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षिका छायाताई बैस चंदेल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक प्रभावती तम्मेवार यांनी केले. 

 दरम्यान मोहिनी कोंडावार व प्रभावती तमेवार यांनी शाळेत सुंदर फलक लेखन करून वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर स्वागत गीताने माता-भगिनींचे स्वागत केले .मनीषा माळवतकर मीरा कदम यांनी हळदीकुंकू व मकर संक्रातीचे वाण उपस्थित माता-भगिनींना सन्मानपूर्वक भेट केले.

 याप्रसंगी गावातील सर्व माता भगिनी करता वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले. संगीत खुर्ची, नाव घेणे आदी उपक्रम घेण्यात आले.आभार प्रदर्शन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सविता कदम यांनी केले.

टिप्पण्या