नांदेड दि. २० जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट अक्षय बागल यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), गृह मंत्रालय, भारत सरकारमध्ये निवड झाली आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर आणि माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी अक्षय बागल यांचा यथोचित सत्कार करून भविष्यकालीन सेवा व योगदानासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय छात्र सेनेतील कॅडेटच्या निवडीबद्दल उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, एन.सी.सी.चे संचालक लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर प्रा. प्रियंका सिसोदिया, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.साहेब शिंदे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

addComments
टिप्पणी पोस्ट करा