माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ* डॉ. सुरेखा भोसले


नांदेड:( दि.१८ जानेवारी २०२६) 

                राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालयात माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानादरम्यान डॉ.सुरेखा भोसले यांनी, माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ होते, असे प्रतिपादन केले.

               कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते तर प्रमुख व्याख्यात्या डॉ.सुरेखा भोसले, विभागप्रमुख, स्वा. सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा ह्या होत्या 

               माँ जिजाऊ यांनी तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या मुलांवर धर्मनिष्ठा, देशनिष्ठा तसेच समाजसेवा याचे संस्कार केले. राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे व प्रशिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले व त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले, असे मत डॉ. भोसले यांनी व्यक्त केले.

               प्रारंभी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलाश इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऐश्वर्या हमंद यांनी तर शेवटी आभार कु.साक्षी लांडगे यांनी मानले.

                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ. कांचन गायकवाड डॉ. मीरा फड तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आणि उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या