*
सर्वांगीण विकासासाठी खेळ खेळवा: गजानन वाघमारे
सेलू (. ) क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल/फ्लोअर बॉल असोसिएशन व नूतन विद्यालय सेलू वतीने शालेय विभागीय टेनिस व्हॉलीबॉल/फ्लोअरबॉल क्रीडा स्पर्धा दि. ९ जानेवारी रोजी नूतन विद्यालय प्रांगणात उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी उद्घाटक गजानन वाघमारे म्हणाले सर्वांगीण विकास साठी खेळाडूंनी मैदानावर नियमितपणे खेळावे, खेळाडू मध्ये सांघिक भावना, खिलाडुवृत्ती निर्माण होऊन सशक्त युवा पिढी तयार होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: डॉ.व्ही.के.कोठेकर (सचिव नू.वि.शि.सं सेलू)
उद्घाटक:गजानन वाघमारे (गटशिक्षणाधिकारी सेलू)
प्रमुख पाहुणे दत्तराव पावडे, माधव लोकुलवार, संतोष पाटील(मुख्याध्यापक नू.वि.सेलू) रामेश्वर कोरडे, संजय ठाकरे, चंद्रशेखर नावाडे , केंद्रप्रमुख विजय चिकटे, गजानन भिते,
किरण देशपांडे, रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, जिल्हा सचिव गणेश माळवे, सतिश नावाडे, प्रशांत नाईक. आदी उपस्थित होते.
सदरील स्पर्धेत छञपती संभाजीनगर विभागातील १४/१७/१९ वर्षे आतील मुले मुली एकुण २१ संघाचा सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळवे, आभार प्रदर्शन संजय भुमकर यांनी मानले.
शालेय विभागीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा अंतिम निकाल: 14 वर्षे मुले
प्रथम: नूतन विद्यालय सेलू (परभणी ग्रामीण), व्दितीय: सरस्वती प्रा.शा. जवळा बाजार (हिंगोली), तृतीय: मॉडर्न इंग्लिश स्कूल माजलगाव (बीड).
14 वर्षे मुली:-
प्रथम: प्रथम: इंदिरा गांधी कन्या वि.जवळा बाजार (हिंगोली), व्दितीय: सोमेश्वर विद्यालय आरखेड पालम (परभणी ग्रामीण),तृतीय: स्वामी विवेकानंद इंग्लिश गंगापूर (छञपती संभाजीनगर ग्रामीण.)
17 वर्षे मुले:- नूतन विद्यालय सेलू (परभणी ग्रामीण), व्दितीय:मॉडर्न इंग्लिश स्कूल माजलगाव (बीड). तृतीय: सेन्ट प्रन्सिस सेल्स हायस्कूल छञपती संभाजीनगर .
17 वर्षे मुली: प्रथम: नूतन विद्यालय सेलू (परभणी ग्रामीण), व्दितीय: इंदिरा गांधी विद्यालय जवळा बाजार जवळा बाजार (हिंगोली)
19 वर्षे मुले: प्रथम: नूतन महाविद्यालय सेलू (परभणी ग्रामीण) व्दितीय: एम.आय.पी. महाविद्यालय जवळा बाजार (हिंगोली)
तृतीय: भागीरथी मा.उ.मा.वि. नालेगांव छञपती संभाजीनगर.
19 वर्षे मुली:सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव (बीड) व्दितीय: संत तुकाराम महाराज विद्यालय जोगवाडा जिंतूर (परभणी ग्रामीण)
तृतीय: छञपती संभाजीनगर ग्रामीण.
पंच प्रमुख निलेश माळवे, सोमनाथ पोफळे, कुणाला टाक, चैतन्य नावाडे, सत्यम बरकुले, आदी परीश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा