नांदेड :
विद्यादिप एज्युकेशनल, सोशल ॲन्ड कल्चरल तेलगू सोसायटीसंचलीत, नागार्जुना पब्लिक स्कुल, कौठा नांदेड येथे शाळेच्या प्री-प्रायमरी विभागात विद्यार्थ्यांसाठी ‘मिनी झू’ हा अभिनव व शैक्षणिक उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्ले एरियाचे आकर्षक स्वरूपात रूपांतर करून पाळीव प्राणी, वन्य प्राणी तसेच जलचर प्राणी यांची संकल्पनात्मक मांडणी करण्यात आली होती.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना प्राण्यांविषयी माहिती देतअनुभवाधारित व आनंददायी शिक्षण देणे हा होता. शिक्षकांनी मुलांना सोप्या भाषेत, गाणी, गोष्टी व संवादात्मक पद्धतीने प्राण्यांची माहिती दिली. मुलांनी व पालकांनी हा उपक्रम अत्यंत आनंदाने अनुभवला व मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
सदर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे निरीक्षण कौशल्य, जिज्ञासा व पर्यावरणाविषयीची जाणीव वाढण्यास मदत झाली.
पालकांनीही या उपक्रमास भेट देऊन शाळेच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
निवृत्त कृषी अधिकारी श्री गोविंद बजाज सर यांनी सदरील उपक्रमास भेट देवून उपक्रमाचे कौतुक केले
सदरील कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैला पवार, सचिवश्री केशव गड्डम सर, श्रीकांत गड्डम, सौ. कनक दुर्गा देवी गड्डम, प्रदिपपवार हे उपस्थित होते. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीउपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा