नांदेड:(दि. १५ जानेवारी २०२६)
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते तर विशेष व्याख्यात्या ग्रामीण महाविद्यालय, मुखेड येथील इंग्रजी विभागातील डॉ.शिल्पा शेंडगे होत्या.
डॉ. शिल्पा शेंडगे यांनी, महापुरुषांच्या जयंती या मानवांना प्रेरणा व ऊर्जा देतात. आजच्या स्त्रियांनी स्वतःला जाणून स्वतःची व देशाची प्रगती करावी, असे प्रतिपादन केले
प्रारंभी प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.कोमल कागदेवाड यांनी केले तर आभार सोनिया सूर्यवंशी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. राजरत्न सोनटक्के डॉ. कांचन गायकवाड, डॉ.मीरा फड, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा. अभिनंदन इंगोले, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा