पीपल्स हायस्कूल येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 


---------------------------------------------- टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन 

--------------------------------------

नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स  हायस्कूल येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी. या जयंती उत्सवाचे अवचित्य साधून शाळेतील शिक्षिका अनिता  सुरोशे  यांच्या मार्गदर्शनाखाली लहान लहान मुलांनी अनेक टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन  शालेय समितीचे अध्यक्ष स. नौनिहाल सिंघ जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले. **वापरा व फेका या विचारा नुसार आपण वापरत असलेल्या अनेक प्लास्टिकच्या वस्तूचे ढिगारे  निर्माण होत असून प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने मातीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यावर नियंत्रण मिळण्यासाठी प्लास्टिकच्या वस्तू पासून अनेक टिकाऊ वस्तू बनविण्यात आले. प्लास्टिकची पिशवी वापरण्याऐवजी  कापडी पिशवी वापरून पर्यावरणाचे संरक्षण करणे गरजेचे आहे हे या प्रदर्शनातून दाखवून दिले**. या प्रदर्शनात 123 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, पर्यवेक्षक प्रशांत चौधरी, कार्यकारणी सदस्य राहुल गोरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख, व्ही. आर. चिलवरवार व प्रफुल्लता फुलारी, प्राथमिकच्या  मुख्याध्यापिका सोनाली केंद्रे हे उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात   स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले.यानंतर   शाळेचे मुख्याध्यापक नितीन सेलमोकर, दुपार स्विफ्ट इन्चार्ज राजश्री भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप  चौ पुल्लावार यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पालेपवाड आभार व्ही. आर. चिलवरवार यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या