जुक्टा संघटनेच्या वतीने सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

 


नांदेड – नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना (JUKTA) यांच्या वतीने सायन्स महाविद्यालय नांदेड येथे भव्य सत्कार व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात ग्रामीण साहित्यातील जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल जुक्टा संघटनेचे मार्गदर्शक मा. श्री डी. बी. जांभरुणकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रा. सतीश बैनवाड यांची पर्यवेक्षक म्हणून झालेल्या नियुक्तीबद्दल तसेच प्रा. मारुती डुरके यांना नांदेड एज्युकेशन सोसायटीचा “उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील हे होते. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, उपप्राचार्य प्रा. एकनाथ खिल्लारे, जुक्टा संघटनेचे मार्गदर्शक प्रा. मुकुंद बोकारे, संघटनेचे अध्यक्ष प्रा. संभाजी वडजे, सचिव प्रा. नारायण गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी जुक्टा संघटनेची 2026 सालची दिनदर्शिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नारायण गाढवे यांनी केले तर संघटनेच्या कार्याचा आढावा आणि उद्देश अध्यक्ष प्रा. संभाजी वडजे यांनी आपल्या मनोगतात मांडला.

मा. श्री डी. बी. जांभरुणकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “जीवनगौरव पुरस्कार हा संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. संघटनेने दिलेल्या पाठबळामुळेच हे यश शक्य झाले.”

कार्यक्रमात सायन्स महाविद्यालयातील नवनियुक्त शिक्षक व दिनदर्शिका संपादक प्रा. विजय कदम यांचाही सत्कार जुक्टा संघटनेच्या वतीने करण्यात आला.

समारोपाच्या अध्यक्षीय भाषणात सीए डॉ. प्रवीण पाटील यांनी सांगितले की, “शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षकांनी संघटनेशी जोडून राहून आपल्या प्रश्नांसाठी एकजूट दाखवावी. संस्था आणि संघटना दोन्ही परस्पर सहकार्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकतात.”

 कार्यक्रमास सायन्स महाविद्यालयातील. पीपल्स कॉलेजमधील. महिला महाविद्यालयातील प्राध्यापक, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलजा वडजे यांनी केले तर प्रा. एकनाथ खिल्लारे यांनी आभार मानले.

टिप्पण्या