नांदेड लातूर महामार्गावर सोनखेड जवळील कलंबर फाट्याजवळ लातूरहून नांदेडकडे येणा-या एमएच २६ एके ६४४४ या हयूंडाई कारने डिव्हायडरला जबरदस्त दिल्यामुळे कारचा जागीच स्फोट झाला यात चालक होरपळून गेला असून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणे यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. घटनेची माहिती नांदेड येथील एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.
अग्निशामक दलाने तात्काळ वाहनाची आग विझवली व होरपळून गेलेल्या चालकाच्या मृतदेहास विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयांमध्ये आणण्यात आले. सदर घटना रात्री उशिरा घडली असून त्या चालकाचे नाव रात्री उशिरापर्यंत ही समजले नव्हते सदर वाहन हे नांदेड पासिंगचे असून नांदेड परिसरातील वाहन चालक असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेनंतर नांदेड लातूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनाची कोंडी झाली होती. नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या घटनेबाबत सोनखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा