नांदेड:(दि.२ डिसेंबर २०२५)
इटलीची राजधानी रोम येथे संसर्गजन्य रोगासंदर्भात आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सत्राध्यक्ष व बीजभाषक म्हणून यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील डॉ. विक्रम देशमुख यांनी सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे यासाठी त्यांना ए. एन.आर.एफ. भारत सरकार यांचे आंतरराष्ट्रीय प्रवास सहकार्य मिळाले. त्यांचा इटली येथील युरोपियन काँग्रेसकडून सन्मान करण्यात आला.
प्रा. डॉ. विक्रम सटवाराव देशमुख हे हदगाव तालुक्यातील इरापूर येथील मूळ रहिवासी असून ते सध्या यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागामध्ये कार्यरत आहेत. युरोपियन काँग्रेसमार्फत रोम, इटली येथे संसर्गजन्य रोग या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉ. विक्रम देशमुख यांनी विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. परिषदेमध्ये त्यांनी सत्राध्यक्ष होण्याबरोबरच बीजभाषक म्हणून कार्य पार पाडले. शिवाय व्यवस्थापकीय सदस्य म्हणूनही भूमिका बजावली. संसर्गजन्य रोग या विषयावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. साता समुद्रापलीकडे जाऊन नांदेडच्या या शिक्षकाने संसर्गजन्य रोगासंदर्भात दिलेले योगदान इटली येथे विशेष गाजले.
या योगदानाबद्दल श्री. शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण, उपाध्यक्षा माजी आमदार सौ. अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री श्री.डी.पी. सावंत, सहसचिव माजी प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अँड. उदयराव निंबाळकर आणि सर्व कार्यकारिणी सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी यथोचित सत्कार केला आणि भविष्यातील संशोधकीय व शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, मार्गदर्शक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय ननवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. के.आर. रबडे, पर्यवेक्षिका प्रा.वंदना बदने, प्रा.महेश कनशेट्टे, प्रा.संजीव करखेलीकर, डॉ. वैजनाथ खरात, प्रा.व्यंकटेश पतंगे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे आदींसह सहकारी मित्र व कर्मचारी वर्गानी स्वागत केले.
विशेष बाब म्हणजे डॉ. विक्रम देशमुख नुकतेच लाईफ सायन्सेस या विषयात सेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल सुद्धा त्यांचे संस्था व महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा