कर्जबाजारी महिला शेतकऱ्याची आत्महत्या

  • कर्जापाई शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ

  • बँक आणि बचत गटांची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

  • श्रीक्षेत्र माहूर

माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डि दासू नाईक तांडा येथील कर्जबाजारी शेतकरी महिलेने राहत्या घरी सकाळी पाच वाजता विषारी औषध प्राशन केल्याने घरच्या मंडळींनी तिला वाइ बाजार आणि माहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तिची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवल्याची घटना दि १२ रोजी घडल्याने खळबळ उडाली आहे

माहूर तालुक्यातील मौजे मच्छिंद्र पार्डि दासू नाईक तांडा येथील सुनिता परसराम राठोड वय 49 वर्षे यांची माहूर शिवारात गट नंबर 83 मध्ये पाच एकर कोरडवाहू शेती आहे त्यांचे वर भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे एक लाख रुपये कर्ज आहे तर बचत गटांचे कर्ज असल्याने बँकेकडून व बचत गटाकडून जास्त प्रमाणात तगादा झाल्याने त्यांना सदरील आर्थिक व मानसिक त्रास सहन झाला नाही त्यामुळे दि 12 रोजी सकाळी 5 वाजता राहत्या घरात त्यांनी विषारी औषध प्राशन केले सदरील घटना त्यांचे पती परसराम राठोड मुलगा यांना कळाल्याने त्यांनी लगेच त्यांना महेंद्र चव्हाण गणपत मडावी यांच्या मदतीने वाईबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले येथे परिस्थिती बिघडल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली

उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याने पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश गेडाम पोलीस नाईक सत्यपाल मडावी यांचे सह पोलिसांनी घटनेची नोंद घेतली तर त्यांचे डॉ बिपिन बाबळे यांनी शवविच्छेदन केले त्यांचे पश्चात पती सासू मुलगा असा परिवार असून बँकांचा तगादा आणि बचत गटांचे एजंट वेळोवेळी कर्जाची मागणी करत त्रस्त करून सोडत असल्याने पुरुष कर्जबाजारी शेतकऱ्यासह आता महिला कर्जबाजारी शेतकऱ्यावरही आत्महत्या करण्याची पाळी येत असल्याने शासनाने सर्व प्रकारची कर्ज वसुली तात्काळ थांबवून मयतांच्या वारसांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे

टिप्पण्या
Popular posts
सूरज गुरव यांनी सांगितलेला प्रेरणादायी 'विद्यार्थीधर्म' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज
आंबेडकरी विचारांनी स्त्री-उत्कर्षाचा मार्ग सुकर — डॉ. संध्या रंगारी*
इमेज
वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक* भारतातील रोजगार हमी योजनेचे जनक कै. वि. स .पागे यांची २१ जुलै रोजी जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा हा गौरवास्पद आलेख ..
इमेज
रांची येथील राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत अद्या बाहेती ला रौप्य पदक*
इमेज
सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आनंद मेळावा
इमेज