चाकूर (प्रतिनिधि)। अखिल भारतीय अन्नशास्त्रज्ञ व अन्नतंत्रज्ञ परिषदेच्या उपाध्यक्ष पदी - युवा शास्त्रज्ञ,डोंगरजचे सुपुत्र डॉ.दिनकर बळीराम कांबळे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.डाॅ दिनकर कांबळे सध्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठ,नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.ते या निवडणूकीसाठी दिल्ली विभागाकडून थांबले होते. या निवडणूकीत देशभरातून नवू शास्त्रज्ञ उभे होते.नवखे डॉ दिनकर कांबळे हे विजयी झाले.
डॉ दिनकर कांबळे हे साहित्यिक बळीराम डोंगरजकर यांचे चिरंजीव असून ते एम्.टेक्.पीएच.डी.आहेत.त्यांनी आत्तापर्यत अनेक कृषीसंबधित अन्नपरिषदांमध्ये भाग घेऊन अनेक शोधप्रबंध सादर केले आहेत.त्यांना देशपातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ दिनकर कांबळे हे सध्या दिल्ली येथिल इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय मुक्त विद्यापीठात कार्यरत आहेत.यापुर्वीपण ते अ.भा. अन्नशास्त्रज्ञ व अन्नतंत्रज्ञ परिषदेच्या उपाध्यक्ष पदी होते.त्यावेळी त्यांनी चांगले निर्णय व कार्यकेल्यामुळेच परत एकदा विजयी झाले. तसेच ते विद्यापीठ व ए.एफ.एस.टी.आय.च्या वेगवेगळ्या समितीवर कार्यरत आहेत.
या यशाबद्दल त्यांना देशभरातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले.तसेच अनेक शास्त्रज्ञ व मित्रांनी अभिनंदन केले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा