आय सी एम आर, भारत सरकार व आरोग्य मंत्रालयाने या वर्षी च्या देशातील तेरा निवडक लोकांची आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलिया येथील एका नामांकित विद्यापीठात संशोधन अभ्यासक्रमांसाठी प्राध्यापक डॉ चंद्रशेखर दिगंबरराव बोबडे यांची निवड केली आहे.
यापूर्वी प्रा.डॉ चंद्रशेखर दिगंबरराव बोबडे यांनी भारत सरकारच्या डि एस टी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेकनॉलॉजि पुरस्कृत प्रवास शिष्यवृत्ती ट्रॅव्हल्स ग्रांट, सॅनफ्रान्सिस्को अमेरिकेत ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या शोध निबंधाचे सादरीकरण करून यश संपादन केले होते. डॉ बोबडे हे शेणी ता.अर्धापुर जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून डॉ विश्वनाथ कराड एम आय टी विश्वशांती विद्यापीठ पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यशातील सातत्य कौतुकास्पद आहे. यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा