संविधान म्हणजे दस्तऐवज नव्हे; तर जीवन पद्धती -डॉ.विशाल पतंगे

 


नांदेड:( दि.२७ नोव्हेंबर २०२५) 

               राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड यांच्या वतीने संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

               प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि भारतीय संविधान उद्देशपत्रिका प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

                स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दि. २६ नोव्हेंबर रोजी मानव्यविज्ञान विद्याशाखा आय.सी.टी. हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

               अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते तर प्रमुख वक्ते पीपल्स कॉलेज, नांदेड येथील राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ.विशाल पतंगे होते.

            डॉ. विशाल पतंगे यांनी, संविधानाची व्याख्या, संविधानाचे तत्वज्ञान व कलम यावर सविस्तर चर्चा केली. संविधान प्रत्येक व्यक्तीने वाचणे व त्यावर अंमलबजावणी करणे; हे अत्यंत गरजेचे झालेले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

                सूत्रसंचालन कु.कोमल कागदेवाड यांनी तर प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले यांनी केले 

               यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन डॉ. राजरत्न सोनटक्के यांनी केले.  

               अध्यक्षीय समारोप इतिहास विभागप्रमुख डॉ. शिवराज बोकडे यांनी केले. शेवटी आभार प्रा. राजश्री जी.भोपाळे यांनी मानले.

               याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ. संगीता शिंदे (ढेंगळे), डॉ.वनदेव बोरकर, विद्यापीठ परीक्षा केंद्रप्रमुख डॉ.विजय भोसले, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.शबाना दुर्राणी, डॉ.शिवराज शिरसाठ, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. धनराज भुरे, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ.संदीप खानसोळे, डॉ. साईनाथ बिंदगे, डॉ. दीप्ती तोटावार, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा. अभिनंदन इंगोले, प्रा.शांतूलाल मावसकर, डॉ. साहेब माने आदी प्राध्यापकवृंद आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

                कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांनी परिश्रम केले तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

टिप्पण्या