एन.आर.एम.यू. सी.आर.के.आर.चा दणदणीत विजय; कामगारांचा कॉ. वेणू पी. नायर यांच्यावर विश्वासाचा शिक्का

मुंबई, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी 

सेंट्रल रेल्वे मुंबई मंडळातील दादर, कुर्ला, ठाणे, कल्याण आणि लोणावळा रेल्वे इन्स्टिटयूटमधील निवडणुकांमध्ये एन.आर.एम.यू. – सी.आर.के.आर. युनियनने प्रभावी विजय संपादन केला. विविध राजकीय संघटना एकत्र येऊन विरोधक म्हणून उभ्या राहिल्या होत्या. मात्र, कामगारांनी मतदानाद्वारे युनियनवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित करत विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरवले.

युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या नेतृत्वावरील निष्ठा, कामगारांप्रती आपुलकी, सुख-दुःखात सहभागी होण्याची वृत्ती आणि कामगारांनी त्यांच्या नेतृत्वाला व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय निश्चित झाल्याचे मानले जात आहे. कामगारांनी सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करून विरोधी गटांना स्पष्ट संदेश दिला

नेशनल रेल्वे मजदूर युनियन ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसून सर्व धर्म समभाव पाळणारी व कामगारांच्या हक्कांसाठी सतत लढणारी युनियन असल्याचे या निकालाने पुन्हा सिद्ध झाले.

निवडणूक प्रचारात दिवस-रात्र कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचे तसेच मतदानासाठी वेळ देणाऱ्या सर्व कामगारांचे आभार मानताना महामंत्री कॉ. नायर म्हणाले की,

“ही एकता आणि विश्वास पुढील वाटचालीला नवी ऊर्जा देणारे आहेत. कामगारांच्या हितासाठीची लढाई अखंड सुरु राहील.”

टिप्पण्या