नवी मुंबई : पुणेरी भेळचे प्रसिद्ध मराठी उद्योजक, पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावचे सुपुत्र सागर गोरडे यांच्या " मुंबईचा मराठी भेळवाला" या दुकानाचे उद्घाटन ९ सप्टेंबर २०२५ रोजी सानपाडा येथील सेक्टर ७ मध्ये सिताराम मास्तर उद्यानाजवळ सौ. धनश्री गोरडे यांच्या हस्ते झाले.
सागर गोरडे यांनी अतिशय संघर्षातून हा भेळीचा व्यवसाय सुरू केला आहे. धंदा सुरू करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांनी गावी मुंबईवरून आलेल्या लोकांना चांगल्या दर्जाची भेळ देण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर त्यांनी मुंबईला आल्यावर जुईनगरला एक हॉटेल सुरू केलं. परंतु या हॉटेलमध्ये ते दीड लाख रुपयाचा तोटा सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी सानपाडा येथील गोल्डन पॅलेस हॉटेल जवळ भेळीचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. आता त्यांनी जयराम खरात व सागर गोरडे असा दोघांनी भागीदारीमध्ये नवी मुंबईत " मुंबईचा मराठी भेळवाला" हा भेळीचा व्यवसाय सुरू केला आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी या ठिकाणी त्यांच्या भेळीची चव घेतली आहे. सानपाड्यातील रहिवाशांनी देखील नवी मुंबईतील मराठी माणसाच्या भेळीची चव घ्यावी. अशा प्रकारच्या शुभेच्छा सानपाड्यातील समाजसेवक भाऊ भापकर, पांडुरंग आमले, सोमनाथ वासकर, बाबाजी इंदोरे, मारुती विश्वासराव, सुभाष बारवाल, चंद्रकांत सरनोबत आदी मान्यवरांनी सागर गोरडे आणि जयराम खरात यांच्या भेळ व्यवसायाला दिल्या. त्याचप्रमाणे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जावो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. सागर गोरडे आणि जयराम खरात यांनी आपली मनोगत व्यक्त केली. सर्वांचे स्वागत आणि सभेचे सूत्रसंचालन सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी केले. गागाभट्ट यांच्या कुळातील द्वारकाप्रसाद भट यांनी दुकानाची पूजा केली. उद्घाटन सोहळ्याला सानपाड्यामधील रहिवासी, सानपाड्यामधील गार्डन ग्रुप आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा