मोफत उन्हाळी टेबल टेनिस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन*



परभणी (.               )परभणी.बी रघुनाथ महाविद्यालय ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटना व चेतनानंद टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी येथील जिंतूर रोडवरील बी .रघुनाथ महाविद्यालय येथे दिनांक 8 मे ते 15 मे या कालावधीत उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना विरंगुळा म्हणून  विशेष आठ दिवसाचे टेबल टेनिस या खेळाचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी परभणी शहरातील टेबल टेनिसच्या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व आवड असणाऱ्या सर्व विद्यार्थी व टेबल टेनिस प्रेमींनी या शिबिरचा लाभ घेण्याची संधी बी रघुनाथ महाविद्यालयाने परभणी शहरात उपलब्ध करून दिलेली आहे. 

या उन्हाळी विशेष प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रा.डॉ. विनोद गणाचार्य व श्री.चेतन मुक्तावार (9766679636) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे व परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस सचिव गणेश माळवे अशोक सोनी अध्यक्ष बी रघुनाथ महाविद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या