उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांना काव्यमित्र संस्था पिंपरी चिंचवड पुणेचा " आचार्य अत्रे साहित्य गौरव पुरस्कार " जाहिर झाला असून चिंचवड येथील तारांगण ऑडिटोरिअमच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा " चिव चिव चिमणी " व " कोल्हेवाडीचा बाजार " ही दोन बालकवीतासंग्रह व "आदर्श नगरीचा राजू " ही किशोर कादंबरी अशी तीन पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री. जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर ता. जुन्नर जि. पुणेचा राज्यस्तरीय बाल साहित्य पुरस्कार, नांदेड येथील यशवंतराव चव्हाण विचार मंचचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव राष्ट्रीय बाल साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांचे नांदेड आकाशवाणीवरून अनेक वेळा काव्यवाचन प्रसारित झाले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा