राष्ट्रीय शिक्षणरत्न परमेश्वर जाधव सन्मानित


परभणी (.          ) मुंबई येथे दि. 20 मे रोजी एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने परभणी गांधी विद्यालय पर्यवेक्षक तथा क्रीडा शिक्षक परमेश्वर जाधव यांना राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्राच्या मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल  चाळीस वर्षे आपल्या अभिनयातून गाजवणाऱ्या उषाताई नाडकर्णी , संगीतकार आलीखान, मुंबईचे मा. आयुक्त चहेल , आशा नामवंत व्यक्ती सोबत पुरस्कार मिळणे हि जीवनातील आनंदाचा क्षण होता . मुंबईतील आझाद मैदानावरिल भव्य अशा मराठी पत्रकार भवनात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्राचे सहकार व पणन राज्यमंत्री आ. बाबासाहेब पाटिल साहेब , लोकप्रीय शिक्षक आमदार  विक्रम काळे साहेब , मा. आमदार  रामराव वडकुते साहेब यांच्या उपस्थीती होती . शैक्षणिक , सामाजिक , राजकीय , सांस्कृतीक, व्यवसायिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील मानवरांच्या एकता सेवा भावी मचं महाराष्ट्र तर्फे  मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला . 

       परमेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली4 आंतरराष्ट्रीय व 672 खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तर हजारो राज्य क्रीडा स्पर्धेत प्राविण्य व सहभागी झाले आहेत. तसेच त्यांनी पारंपारिक लाठीकाठी, लेक्षीम, कवायत, यात अनेक खेळाडू तयार केले आहेत. यांच्या उज्वल कार्य वरुन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित असणारे माधवराव शिंदे विजयराव गारकर , विलास जाधव व ईतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

टिप्पण्या