*बुद्ध पौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन*

गंगाखेड( प्रतिनिधी)* 

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सवंगडी कट्टा सामाजिक समूह गंगाखेड यांच्या  संयुक्त विद्यमान शहरातील गीता मंडळ हॉल येथे दि 12 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3  वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

आपण केलेल्या रक्तदानामुळे निश्चित एका गरजवंताला जीवनदान मिळू शकते. हे आपल्या सर्वांचे सामाजिक कर्तव्य व जबाबदारी आहे. तरीही समाजातील  सर्व स्तरातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरा मध्ये रक्तदान करून उपकृत करावे अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अतुल तुपकर व सवंगडी कट्टा सामाजिक समूहाचे मनोज नाव्हेकर, ज्ञानेश्वर वायकर, डॉ किशोर कुगणे, विष्णू  अनावडे, गजानन महाजन, सागर गोरे, सचिन कोटलवार, बालाजी शिंदे, श्रीकांत डांगे, ऍड संतोष पुजारी, कारभारी निरस, इंद्रजीत जाधव, रमेश औसेकर यांनी केलेली आहे.

टिप्पण्या