*उन्हाळ्याची सुट्टी पुस्तकांशी गट्टी उपक्रमास प्रतिसाद*
उन्हाळ्याच्या सुटयामध्ये ग्रामीण भागातील मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चरिटीज (एचएआरसी) संस्थे तर्फे नांदेड जिल्ह्यातील 12 विविध तालुक्यातील 14 वाचनप्रेमी जिल्हा परिषद शाळेला सृजन आनंदी वाचनपेटी भेट देण्याचा कार्यक्रम जि प प्रा शाळा पासदगाव ता नांदेड येथे दि 11 में रोजी आयोजित करण्यात आला होता.
*प्रमुख उपस्थिती* यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खल्लाळ सर प्रमुख अतिथी एचएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन चांडक, माजी गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले, मराठवाडा स्पर्धा समनव्यक प्रकाश डुबे, राजेश्वर वासलवार, सरपंच ललिता अन्नपूर्णे हे उपस्थित होते.
*12 तालुक्यातील 14 जि प शाळेला वाचनपेटी भेट* या प्रसंगी एचएआरसी संस्थे तर्फे नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आरळी, बारड, पार्डी, केरूर, थडी सावरगाव, हरितांडा, इज्जतगाव(आ), जाकापूर, टाकराळा बु., ब्रँच मुखेड, उमरी (जहागीर), पिंपळढव, पासदगाव, पाकीतांडा असे ऐकून 14 शाळेला प्रत्येकी 70 पुस्तकांची आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आली.
सुरुवातीला उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी स्वतंत्र विचार करणारी पिढी निर्माण करण्यासाठी वाचणारी मुले तयार झाली पाहिजे. पुस्तके आयुष्यात सकारात्मक बदल घडवतात त्यामुळे अन्नदानापेक्षा ज्ञानदान करा त्यासाठी शाळांना पुस्तके भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ.पवन चांडक यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की *होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) संस्थेच्या वतीने आतापर्यंत नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, परभणी, बीड व पुणे जिल्ह्यातील 152 शाळांना ही आनंदी वाचन पेटी लोकसहभागातून भेट देण्यात आली*. या वाचन पेटीमध्ये पुस्तकांचा खजिना असून यात कथा व कविता संग्रह, महापुरुषांची,शास्त्रज्ञांची चरित्रे उपलब्ध असून मराठी, हिंदी व इंग्रजी तिन्ही भाषेत हे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.
*लोकसहभागातून दातृत्व*: डॉ. सचिन खल्लाळ, श्रीमती मेटकर एस बी, डॉ श्रीनिवास केशेट्टी, डॉ झहीर बेग, राजू सेठ अग्रवाल, सौ अर्चना वट्टमवार या दात्यांनी एचएआरसी संस्थेला डोनेशन दिले ज्यातून ही आनंदी वाचनपेटी भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सू्त्रसंचालन अश्विनी कौरवार यांनी तर आभार प्रदर्शन पंडित तोटेवाड यांनी केले. यावेळी सुधीर साबणे,श्रीराम बोरोड,राजू भद्रे,निळकंठ मठपती,धनराज कानवटे,संदिप स्वामी, संतोष राऊत व विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते
addComments
टिप्पणी पोस्ट करा