नांदेड - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून विविध ट्रेड उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना एसटी महामंडळाने शिकाऊ उमेदवार (ॲप्रेन्टीससिप) म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागीय कार्यशाळेकडून (एसटी वर्कशॉप) नांदेड यांच्या मार्फत (एसटी डेपो) नांदेड आगार येथे एक वर्षाच्या कालावधीसाठी 36 शिकाऊ पाठविलेले उमेदवार प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत. त्यापैकी 18 शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थींचा एक वर्षाचा कालावधी 31 जानेवारी 2025 शुक्रवार रोजी पूर्ण झाल्यामुळे एसटी डेपो नांदेड आगारातील कामगार कर्मचाऱ्यांच्या वतीने दि.1 फेब्रुवारी 2025 शनिवार रोजी रा.प.म.नांदेड आगारात त्यांचा आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते पुष्पहार, शाल, प्रत्येकी टिफिन डब्बा भेट देवून सत्कार करून शुभेच्छा रूपी निरोप देण्यात आला.
यामध्ये शिकाऊ उमदेवार ओंकार मॅकलवाड, अनिकेत सोनटक्के, मोहम्मद युसूफ, सय्यद फरीद, विशाल लोकरे, शेख अदनान, आवेस खान यांचा समावेश होता. यावेळी आगार व्यवस्थापक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, या सर्वच शिकाऊ उमेदवारांनी वर्षभरात चांगले काम केले असून याचा फायदा भविष्यात त्यांना नक्कीच कामी येईल, असे प्रतिपादन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्रीनिवास रेणके, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड , पाळी प्रमुख मनोहर माळगे, अविनाश भागवत, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, वाहन परिक्षक नामदेव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या निरोप समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, एसटी महामंडळामध्ये चालक, वाहक, यांत्रिक, विभागात काम करणारे हे कामगार-कर्मचारी प्रतिकुल परिस्थितीमध्ये कुठेही आपल्या कर्तव्यात तग धरून कमी पडत नसतात, असे प्रतिपादन केले. प्रमुख वक्ते म्हणून ते पुढे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, आज एक वर्षाचा एसटीतील कामाचा अनुभव या शिकाऊ उमेदवारांना भविष्यात त्यांच्या जीवनात औद्योगिक क्षेत्रात, आस्थापनेत या कार्य अनुभवाचा लाभच होईल, असे बोलून एसटी मधील वर्षभरात यांनी मोलाचे योगदान दिले आहे असेही ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा