बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतच्या रोहीयो व प्रधानमंत्री आवास योजनाची जनसुनावणी

बिलोली /प्रतिनिधी 

बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतची रोहीयो अतंर्गत झालेली कामे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत झालेल्या कामांची जनसुनावणी दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी पंचायत समिती बिलोली च्या सभागृहात जिल्हा तक्रार निवारण प्राधिकरण अधिकारी बुलढाणा येथील दादाराव जाधव हे अध्यक्ष म्हणून तर जिल्हा सादन व्यक्ती नेमीचंद चौव्हाण तर
गटविकास अधिकारी श्रीनिवास पद्मवार, एपीओ सोंडारे एनजीओ प्रतिनिधी रत्नाकर जाधव वृत्तांकन प्रतिनिधी म्हणून भीमराव बडूरकर मजूर प्रतिनिधी बालाजी येलगंद्रे अभिवक्ता प्रतिनिधी अविनाश पाचपिपळे यासह तालुक्यातील विविध गटातील लोक उपस्थित होते. * बिलोली तालुक्यातील रोहीयो आणि प्रधानमंत्री आवास योजनाच्या घरकुलांचे  महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण मंत्रालय मुंबई व्दारा साधन व्यक्ती यांनी तालुक्यात ७३ ग्रामपंचायत येथे प्रत्येक्ष जावून रोहीयो आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाची व कागदपत्रांची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला. सदरील अहवालाची जनसुनावणी दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी बिलोली पंचायत समिती सभागृहात पार पडले. यावेळी सादर केलेल्या अहवालात त्रुटी बाबत चर्चा झाली. यावेळी गैरहजर असलेल्या ग्रामसेवक व रोजगार सेवक बाबत चर्चा करुन एसओपी समिती कडून चौकशी करण्याचे  इतीवृत्तात नोंद करण्यात आली. याचबरोबरच  गावपातळीवर अनेक त्रुटी विषयी बाबत ५ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशीत केले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना बाबत चर्चा झाली. त्यावेळी घरकुल इंजिनिअर कडून अनेक चुका दिसून आल्या यामध्ये सावळी येथिल ५ घरकुलधाकांचे घर पुर्ण झाल्याचे इंजिनिअर दाखवल्यामुळे रोहीयो अंतर्गत मिळणारे १८ हजार रुपया पासून संमधीत सर्व घरकुल लाभधारक वंचित आहेत. यावेळी जनसुनावणी अधिकारी यांनी धारेवर धरले याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यावेळी  तालुक्यातील काही ग्रामसेवक, रोजगार सेवक यासह अनेक लोक उपस्थित होते.

टिप्पण्या