ग्रामविकास अधिकारी व्यंकट पाटील यांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू

 

नायगांव प्रतीनीधी 
   नायगांव पंचायत समीतीचे ग्रामविकास अधिकारी तथा मुगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक व्यंकट पाटील यांचा आज सकाळी एका भीषण अपघातात मृत्यू झाला त्यांच्या या दुर्दैवी मुर्त्यमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार बिलोली तालुक्यातील मौ.बामणी येथील रहिवासी तथा नायगाव पंचायत समितीचे मुगाव येथे कार्यरत असलेले ग्रामविकास अधिकारी व्यंकट पाटील यांचा आज सकाळी आसना पुल येथे कारने नांदेड कडे जात असताना त्यांच्या वाहनाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या आसना वर जाऊन आदळली व भीषण अपघात झाला जोरदार धडकेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आणि पोलिसांना कळवले व्यंकट पाटील हे त्यांच्या कार्यतत्परतेसाठी आणि ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानासाठी ओळखले जात होते त्यांच्या अचानक जाण्याने गावात शोककळा पसरली असून त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ,शिवाजी पा. पाचपिपळीकर,माजी शिक्षण सभापती संजय अप्पा बेळगे, अजनीचे सरपंच महेश पा हांडे, नायगांव ग्रामसेवक संघटनचे तालुकाध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर यासह सर्व ग्रामसेवक संघटनचे पदाधिकारी बिलोली व नायगांव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, व असंख्य जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पण्या