नांदेड:( दि.१५ जानेवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने दि.१५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन लॅंग्वेज लॅब इंग्रजी विभागात उत्साहात संपन्न झाला.
माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ.एम.एम.व्ही बेग यांनी भूषविले. याप्रसंगी विचारमंचावर राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर आणि वाणिज्य विभागातील प्रा.प्रियंका सिसोदिया यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एम. एम. व्ही. बेग यांनी, आज ७७ व्या भारतीय लष्कर दिनानिमित्त आपल्या देशाच्या सुरक्षेचे रक्षक असलेल्या भारतीय लष्कराच्या अतुलनीय शौर्य आणि धैर्याला सर्व भारतीय सलाम करतात. दररोज कोट्यावधी भारतीयांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या शूरवीरांनी केलेल्या बलिदानाला आम्ही स्मरण करतो, असे मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविक व संचलन लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर यांनी केले. आभार प्रा.प्रियंका सिसोदिया यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रशांत मुंगल, एजाज शेख आणि सर्व एनसीसी कॅडेट्सनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा