नांदेड दि.
मानवी आयुष्यात तान-तणावाचे मोठे परिणाम होत असतात. मनावरील सकारात्मक ताण हे मानसिक आरोग्याला पोषक आणि बळ देणारे ठरते. शारीरिक आरोग्या पेक्षाही मानसिक आरोग्य सांभाळणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ.उमेश अत्राम यांनी केले आहे.
ग्रामीण तंत्रज्ञान व व्यवस्थापन महाविद्यालय संकुल विष्णुपुरी येथे डी. एम.एल.टी. विभागाकडून विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ओमप्रकाश दरक यांच्या अध्यक्षतेत "विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे व विषय तज्ञ म्हणून डॉ. उमेश आत्राम हे बोलत होते. चर्चासत्रात महाविद्यालयाच्या ओटी विभागप्रमुख डॉ. दिपाली पाटील रॅपनवाड यांनीही सहभाग घेतला. तर विभाग प्रमुख व्ही.सी.जमदाडे सह सर्व शिक्षकवृंद,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
चर्चासत्रात प्रश्नोत्तरांना सामोरे जाताना डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ उमेश आत्राम यांनी मानसिक आरोग्याचे अनेक पैलू उघडून सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले आपण केवळ नकारात्मक तानाचाच जास्त विचार करतो पण ताण हे नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकारचे असते. सकारात्मक ताण हा मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक व बळ देणारे असते.शारीरिक आरोग्याची आपण जास्त काळजी करण्यापेक्षा मानसिक आरोग्यही टिकवणे महत्त्वाचे असते कारण शारीरिक आरोग्य काही काळा पुरते असते तर मानसिक आरोग्य दूरगामी परिणाम करते. स्ट्रेस मॅनेजमेंट अर्थात तान तणावाचे व्यवस्थापन करताना सकारात्मक ताण समजून घेणे गरजेचे आहे. एखाद्या संकटातून मार्ग काढण्यासाठीचा प्रयत्न हा सकारात्मक ताणातून होतो तर त्या संकटास घाबरून जाणे हा नकारात्मक ताण होय असे मत डॉ उमेश आत्राम यांनी व्यक्त केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा