किनवट माहूर मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!
ज्यांची हृदये झाडाची त्यांनाच फक्त फुले येतात .... तेच वाढतात.... प्रकाश पितात.... अन् साऱ्या समाजाला भरभरून देतात. लोकजाणिवांच्या चौरंगावर मानवतेची पूजा बांधणारा 'माणुसकीचा गहिवर' कर्ततृत्वान लोकनेता नेता माजी आमदार प्रदीप नाईक यांचे आज दिनांक १ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने हैदराबाद येथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक दोन रोजी सकाळी ११ वाजता दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून ख्याती असलेले किनवट माहूर तालुक्यातील भगीरथ माजी आमदार प्रदीप नाईक दूरदृष्टी असलेले लोकनेते होते.त्यांचं नावाचं एक समजदार व्यक्तीमत्व म्हणून गेली २५ वर्ष मतदार संघाच्या नागरिकांच्या सेवेत कार्यरत होते.समाजात काम करताना लोकांच्या अपेक्षांच फार मोठं ओझ घेऊन चालत रहाणं त्यातून आपला तोल सांभळत विकासात्मक काम मार्गी लावणं ही तारेवरची कसरत लोकनेते प्रदीप नाईक हे गेली अनेक वर्ष करत आले आहेत.प्रत्येकाची आपली काम करण्याची एक पद्धती असते हाती घेतलेलं काम राजकीयदृष्ट्या नुकसानदायी ठरल तरी ते समाजाच्या हिताचं आहे.म्हणून हे नुकसानही हसत हसत झेलायला आणि पचवायला फार मोठा
जिगरा लागतो हे विसरता येणार नाही. तुमचं घराणं, परंपरा तुम्हाला नेता म्हणून प्रस्थापित जरूर करू शकेल पण स्थापित आणि साबित मात्र स्वतःलाच करावं लागतं. नाईक साहेबाना सार्वजनिक जीवनातला आजवरचा संघर्ष चांगलं काम करण्यापासून कधीही खंडीत करू शकला नाही.
प्राप्त परिस्थितीचा अधिक विचारपूर्वक व दोष विरहित काम करण्यासाठी उपयोग करायचा ही त्यांची स्वतःचीच एक खास शैली होती.एखाद्या विषयात नेमकं कोणत्या मेथड ने काम केल्याने ते काम अपेक्षित स्वरूपात मार्गी लागेल याच अभ्यास प्रदीप नाईक सारखं करणारी नेते मंडळी अभावानेच सापडतात व्यक्तीगत व कौटुंबिक हिताला काही वेळा बाधा आली तर त्याच्या पलिकडे जाऊन समाजात चांगल्या गोष्टी रुजाव्यात म्हणून सातत्यपूर्ण विचार करणारा मित्र, सखा, मार्गदर्शक आणि अतिशय सह्दयी माणूस म्हणून प्रदीप नाईक हे कायम स्मरणात राहतील...
लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली
सरफराज दोसानी
माहूर

addComments
टिप्पणी पोस्ट करा