*राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे ग्रामीण संस्कृतीचे जतन -डॉ.शिवराज बोकडे


(दि. १० जाने.२०२५)

          रासेयो यशवंत महाविद्यालयाचे विशेष वार्षिक शिबिर दि.५ जानेवारीपासून मौजे मरळक येथे माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार पार पडत आहे.

          शिबिराच्या चौथ्या दिवसाच्या उदबोधन सत्राचे अध्यक्ष डॉ.अजय टेंगसे (माजी अधिष्ठाता, स्वा.रा.ती.म. विद्यापीठ) होते तर प्रमुख मार्गदर्शक इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे होते.

          विशेष अतिथी डॉ.साहेब शिंदे, डॉ. बी.आर.भोसले व डॉ.डी.डी.भोसले यांची उपस्थिती होती.

          मार्गदर्शनपर भाषणात डॉ. शिवराज बोकडे यांनी, स्वतःच्या सतरा वर्षाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा विभागाचा प्रदीर्घ अनुभव व्यक्त करताना एनएसएस विद्यार्थ्यांचा फक्त व्यक्तिमत्त्वाचा विकास न घडविता विद्यार्थ्यांना समाज मनाशी जुळण्याची संधी देते, असे प्रतिपादन केले. 

          पुढे बोलताना, रासेयो ग्रामीण संस्कृती जतन करण्याचे फार मोठे कार्य करत असल्याचे मत व्यक्त केले.

          अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ.अजय टेंगसे यांनी, डिजिटल लिटरसी या विषयावर माहिती दिली व रासेयो विभागांना डिजिटल साक्षरता वाढवण्याचे आवाहन केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत गायकवाड यांनी केले तर आभार गणेश विनकरे यांनी मानले. 

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. कैलाश इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के प्रा.राजश्री भोपाळे, प्रा.अभिनंदन इंगोले प्रा.श्रीराम हुलसुरे, डॉ.कांचन गायकवाड व शिबिरार्थी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

          विशेष शिबिरातील विविध उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे सहकार्य करीत आहेत.

टिप्पण्या